🔥 TRENDING માંડલીખુટામાં તેજા દશમી નિમિત્તે ભવ્ય... અમરેલીમાં સાંસદ અને રાજ્ય મંત્રી સાથે... मध्य प्रदेश के शहडोल जिले में सोमवार क... NPCIL starts fuel loading for 700 MW U... शहडोल में फूटा रसोइया और स्व-सहायता सम... Tamil Nadu Races to Capture TV, Digita...
21 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
ठाणे-पालघर सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा वादळी; अहवालातील चुकांमुळे सभा तहकूब, नेत्यांमध्ये धक्काबुक्की!ठाणे:
Viral & Trending

ठाणे-पालघर सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा वादळी; अहवालातील चुकांमुळे सभा तहकूब, नेत्यांमध्ये धक्काबुक्की!ठाणे:

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 11 Sep 2026, 05:26 PM 👁 61
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
ठाणे-पालघर सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा वादळी; अहवालातील चुकांमुळे सभा तहकूब, नेत्यांमध्ये धक्काबुक्की!ठाणे:ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज प्रचंड गोंधळ आणि गदारोळ पाहायला मिळाला. बँकेच्या वार्षिक अहवालात झालेल्या गंभीर चुका आणि त्रुटींवरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले. हा वाद इतका विकोपाला गेला की भर सभेत नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र घोषणाबाजी आणि थेट धक्काबुक्की झाली.सभेची सुरुवात झाल्यानंतर अहवालातील संदिग्ध आणि चुकीच्या माहितीवर काही सदस्यांनी आक्षेप घेतला. या मुद्द्यावरून सभागृहातील वातावरण कमालीचे तापले. बँकेचे संचालक आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी अहवालातील या अक्षम्य चुकांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि जोपर्यंत या चुका दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत सभा पुढे ढकलण्यात यावी, म्हणजेच सभा तहकूब करण्याची आग्रही मागणी केली.याच दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. संचालक कपिल पाटील, आमदार किसन कथोरे आणि खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे हे दिग्गज नेते या गोंधळात थेट एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळाले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यामुळे अखेर ही सभा तहकूब करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या वादळी गोंधळामुळे सहकार क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
📲Get App