🔥 TRENDING अब्दुल मन्नान सैत ने बीदर जिला कांग्रे... ધારી નજીક વીજળી પડતા યુવકનું મોત, વાડી... बांका: छेड़खानी के आरोप में प्रभारी प्... હિંમતનગર લૂંટના પ્રયાસના ગુનામાં ૧૬ વર... Two Elderly Men Killed in Car‑Bike Col... Doctor's wife booked in Shahdol child...
02 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी.

✍️ Reporter: Sayyed Mainoddin Peer Sayyed 🗓 02 Oct 2026, 10:10 PM 👁 8
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पालम तालुक्यातील नाव्हा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अंगणवाडी सेविका यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अंगणवाडी भाग क्रमांक १ तर्फे विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आली.या मध्ये गावातील महिला व अंगणवाडी बालक यांनी सहभाग नोंदवला.आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच उपसरपंच, अनेक मान्यवर उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

आज परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील नाव्हा येथे दिनांक २ आक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. नाव्हा येथिल अंगणवाडी सेविका यांच्या तर्फे महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आली या मध्ये गावातील महिला व अंगणवाडी बालक यांनी सहभाग नोंदवला. अंगणवाडी सेविका लता कवटीकवार, गंगाबाई बाबर,कोंडाबाई पांचाळ,शितल केडवे,मिणा गयाळ जया पांचाळ,सुरेखा गहाळ, गावातील सर्व शिक्षक,सरपंच उपसरपंच व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. मुख्याध्यापक व इतर मान्यवर यांनी अंगणवाडी सेविका यांचे आभार प्रदर्शन करून स्पर्धा विजेता यांना बक्षीस देण्यात आले अशाच प्रकारे आपल्या तालुक्यातील सर्व शाळा व इतर संस्था, अंगणवाडी सेविका यांनी कार्यक्रम आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे आणि आपल्या परिसरात उपक्रम राबविण्यात यावी असे सांगून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
📲Get App