Local
शहादे करांच्याएकजुटीला यश
शहादे करांच्या एकजुटीला यश
शहादेकरांच्या एकजुटीला यश! शहरातील रस्त्यांसाठी ₹५ कोटी ३१ लाख ७७ हजारांचा निधी मंजूर
शहादा शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्यांसाठी हक्काचा निधी मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. निवेदने दिली, प्रशासनाकडे मागणी मांडली आणि अखेर नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही केले.
या सर्व प्रयत्नांना आता यश मिळाले असून, जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून शहादा शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी ₹५ कोटी ३१ लाख ७७ हजारांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करणारे सन्माननीय पालकमंत्री, जिल्हाधिकारी मॅडम व जिल्हा प्रशासन, आमदार राजेशदादा, आमदार चंद्रकांतजी रघुवंशी साहेब, सर्व नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक शहादेकराचे मनःपूर्वक आभार!
हा कुणा एकट्याचा विजय नाही, तर शहादेकरांच्या एकजुटीचा आणि सामूहिक प्रयत्नांचा परिणाम आहे.
निधीला मंजुरी मिळाली, आता कामे वेळेत आणि दर्जेदार पूर्ण व्हावीत, यासाठीही आमचा पाठपुरावा सुरूच राहील.
शहाद्याच्या विकासासाठी आपली साथ, आपला विश्वास आणि आपली एकजूट अशीच कायम राहो