🔥 ट्रेंडिंग जालौर में शुक्रवार को पंचायत राज चुनाव... एप्पल ने एआई चिप की कमी के बीच मल्टी‑ई... तेलंगाना भाजपा ने एमएलसी चुनाव रणनीति... तेलंगाना बोर्ड ने मार्च 2027 के IPE पर... शानाया कपूर ने वायरल 'सब गाँव से हैं'... कांग्रेस ने मोदी पर GTA का संदर्भ देते...
19 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

राज्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये 'VB-G RAM G' योजनेतून जलसंधारणाला वेग; आता मिळणार १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी!

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 19 नव. 2026, 04:36 PM 👁 17
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
‘आपले गाव, आपले नियोजन’ उपक्रमांतर्गत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांना सहभागाचे आवाहन
नीड २४ न्यूज महाराष्ट्र / मुंबई (प्रतिनिधी):
जिल्हा प्रतिनिधी: काशिनाथ देसले | तालुका प्रतिनिधी: किशोर पवार
महाराष्ट्र शासनाने राज्यातील ३५८ पैकी सुमारे ३१० तालुक्यांमध्ये (८६ टक्के भाग) दुष्काळ जाहीर केला असून, या संकटावर मात करण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र रोजगार हमी योजना विभागाच्या वतीने ‘विकसित भारत - रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण)’ अर्थात VB-G RAM G योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यातील दुष्काळी व पाणीटंचाईग्रस्त भागातील अकुशल कामगारांना वर्षभरात आता १०० ऐवजी १२५ दिवसांच्या हमखास रोजगाराची हमी मिळणार आहे.
दुष्काळी भागासाठी 'आपले गाव, आपले नियोजन' ठरणार वरदान:
या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे "आपले गाव, आपले नियोजन!". राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील वाडा, विक्रमगड, श्रीवर्धन यांसारख्या दुष्काळी तालुक्यांतील अनेक गावे व वाड्या-वस्त्यांना दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक गावाच्या पाण्याच्या आणि विकासाच्या गरजेनुसार आराखडा स्वतः ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत मिळून तयार करणार आहेत. लोकसहभागातून नियोजन केल्यामुळे दुष्काळी भागात कायमस्वरूपी जलस्त्रोत निर्माण करणे सोपे होणार आहे.
योजनेअंतर्गत समाविष्ट असलेली प्रमुख कामे:
• जलसंधारण व गाळ काढणे: दुष्काळी भागातील भूजल पातळी वाढवण्यासाठी शेततळी, पाझर तलाव, वनराई व सिमेंट बंधारे तसेच तलावातील गाळ काढण्याच्या कामांना विशेष प्राधान्य दिले जात आहे.
• चारा लागवड व उपजीविका: दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चारा मिळावा यासाठी या योजनेतून मका आणि ज्वारीच्या चारा लागवडीला चालना देण्यात येत असून, फळबाग लागवड व गुरांच्या गोठ्यांसाठीही लाभ दिला जात आहे.
• ग्रामीण पायाभूत सुविधा: गावातील अंतर्गत रस्ते, गटारे आणि सार्वजनिक मालमत्तांची उभारणी.
मजुरांचे स्थलांतर थांबणार:
राज्यातील दुष्काळी व ग्रामीण भागातील मजुरांचे उन्हाळ्यात रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवून त्यांना गावातच सन्मानाचा रोजगार मिळावा आणि गावे टंचाईमुक्त व स्वयंपूर्ण व्हावीत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच शासनाने दुष्काळी भागासाठी जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, वीजबिलात सवलत आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा यांसारख्या सवलतीही लागू केल्या आहेत.
तरी राज्यातील दुष्काळी भागातील सर्व नागरिक, शेतकरी आणि मजुरांनी VB-G RAM G योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व ग्रामसभेत सहभागी होऊन आपल्या गावाच्या जलसंधारणाचा व विकासाचा आराखडा ठरवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
📲Get App