पैशाच्या वादातून दगडाने ठेचून हत्या भडगाव पोलिसात गुन्हा दाखल
Watch on:
▶️ YouTube
नगरदेवळा रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ
८०० रुपयांसाठी दगडाने ठेचून हत्या; भडगाव पोलिसात गुन्हा दाखल
भडगाव तालुक्यातील नगरदेवळा रेल्वे स्टेशन परिसरात केवळ ८०० रुपयांच्या वादातून एका ४० वर्षीय मजुराची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मयताचे नाव जुगा कांतीलाल पवार (वय ४०, रा. निपाणे रस्ता, नगरदेवळा, ता. पाचोरा) असे आहे. त्यांचा मृतदेह 22सप्टेंबर रोजी रात्री वस्तीजवळ रस्त्याच्या बाजूला आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धर्मा भाता पवार (रा. निपाणे रस्ता, नगरदेवळा)याने ८०० रुपये काढून घेण्याच्या उद्देशाने जुगा पवार यांच्यावर दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी मयताची आई आशाबाई कांतीलाल पवार (वय ६५)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात आरोपी धर्मा पवार विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद २२ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४.५७ वाजता करण्यात आली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत.
केवळ ८०० रुपयांसाठी एकाचा जीव गेल्याने नगरदेवळा परिसरात खळबळ