पाचोऱ्यात काळीज पिळवटणारी घटना; दोन चिमुकल्यांसमोर पित्याने गळफास लावून संपवली जीवनयात्रा.....!!
यहाँ देखें:
▶️ YouTube
विभागीय प्रतिनिधी
पाचोरा - शहरातील वरखेडी नाका परिसरात राहणारे ३७ वर्षीय हातमजूर योगेश दिलीप पाटील यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे योगेश पाटील हे १५ ऑक्टोबर रोजी दुपारी घरी असताना त्यांची दोन मुलेही घरात होती. आई आणि पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्या असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
हा प्रकार मुलांच्या डोळ्यादेखत घडल्याने घाबरलेल्या मुलांनी मागच्या गल्लीत राहणाऱ्या काकांना धावत जाऊन माहिती दिली. भावाने तातडीने धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. स्थानिकांच्या मदतीने त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार आर्थिक विवंचनेतून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची चर्चा असून वृद्ध आई, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार त्यांच्या मागे आहे. मनमिळावू स्वभावाच्या योगेश यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.