🔥 TRENDING જુનાગઢમાં એસીબીની સફળ ટ્રેપ: ગૌચર દબાણ... Yash Dayal Returns to Uttar Pradesh Ra... Shivpal Yadav slams OP Rajbhar on Face... ABC Launches Monthly 'One Day to Mothe... Six Red Pandas Born at Sikkim Zoo in T... Sikkim Rapper UNB Allegedly Attacked b...
22 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 22 Sep 2026, 09:14 PM 👁 10
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पाचोरा भडगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर

पाचोरा-भडगावच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठं यश

(प्रतिनिधी विलास पाटील).सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचोरा व भडगाव तालुक्यातील कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल घेऊन नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार किशोरआप्पा पाटील यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता.

या पाठपुराव्याला मोठे यश आले असून जिरायत व बागायत क्षेत्रातील एकूण ५३,४९८.८८ हेक्टर क्षेत्रासाठी ४५ कोटी ४८ लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे.

हा निधी म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांच्या हक्काचा पैसा असल्याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्रीमती सुनेत्राजी पवार व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा जाधव पाटील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन, पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.
📲Get App