🔥 TRENDING Bhopal Youth Duped of ₹11.98 Lakh in C... Madhya Pradesh cracks down on 83 hospi... પારનેરા ગામના યાત્રીઓ 12 જ્યોતિર્લિંગન... કાંધલભાઈ જાડેજાની વિનંતી પર ફોદાળા ડેમ... सीतापुर में NH-30 के किनारे अवैध दुकान... અમરેલીમાં મહિલા પોલીસ સ્ટેશન પર માનસિક...
03 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

गुहागर पोलीस निरीक्षकपदी अश्वनाथ खेडकर यांची नियुक्ती

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 03 Sep 2026, 07:26 PM 👁 5
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
गुहागर | ३ सप्टेंबर २०२६

गुहागर पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांची मुंबई येथे विनंती बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अश्वनाथ खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्वनाथ खेडकर हे १९९६ मध्ये सरळ सेवेद्वारे पोलीस दलात दाखल झाले असून, त्यांनी मुंबई शहरात तब्बल २२ वर्षे सेवा बजावली आहे. मुंबई क्राईम ब्रँचमध्ये काम केल्याचा व मुंबईसारख्या मोठ्या शहरातील गुन्हेगारीचा सामना केल्याचा महत्त्वपूर्ण अनुभव त्यांच्या गाठीशी असून, हा अनुभव त्यांच्या पुढील सेवेत निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

मुंबईनंतर त्यांनी रायगड जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर व नाटे येथे पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली असून, अलीकडे ते जिल्हा विशेष शाखा, रत्नागिरी येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. विविध ठिकाणी काम करताना त्यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावीपणे काम केले आहे. गुहागर तालुक्यात पर्यटनाचा वाढता विस्तार, वाहतूक व्यवस्था, कायदा-सुव्यवस्था तसेच विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असताना मुंबई क्राईम ब्रँचपासून जिल्हा विशेष शाखेपर्यंत विविध पातळ्यांवर काम केलेल्या खेडकर यांचा हा अनुभव गुहागर पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि कामात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख असल्यामुळे त्यांच्या नियुक्तीकडे गुहागर तालुक्यातील नागरिकांचेही लक्ष लागले असून, कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासोबतच नागरिकांशी समन्वय साधून पोलिसांमधील विश्वास अधिक दृढ करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. दीर्घा पोलीस अनुभव, मुंबईतील गुन्हे शाखेतील कामाचा गाढा अनुभव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीची जाण या तीनही बाबींचा मेळ त्यांच्या नव्या जबाबदारीत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.
📲Get App