🔥 TRENDING medical જૂનાગઢ જિલ્લામાં આયુષ્માન ભારત યોજના હ... టీజేఎస్ఎస్ రాష్ట్ర కార్యదర్శిగా పంజా స... अररिया, 12 अक्टूबर 2026 અમદાવાદ: ટ્રાફિક પોલીસની માનવતા, રિક્ષ... शिरूर नगरपरिषदेच्या भंगार चोरीप्रकरणी...
14 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
फांगळोशी रस्त्याच्या मधोमध ‘लालपरी’ची ४८ तासांची ‘विश्रांती’; मुरबाडला मेकॅनिक मिळेना, महामंडळाच्या सुस्त कारभारावर प्रवाशांचा तीव्र संताप!
Local

फांगळोशी रस्त्याच्या मधोमध ‘लालपरी’ची ४८ तासांची ‘विश्रांती’; मुरबाडला मेकॅनिक मिळेना, महामंडळाच्या सुस्त कारभारावर प्रवाशांचा तीव्र संताप!

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 14 Oct 2026, 03:41 PM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

फांगळोशी रस्त्याच्या मधोमध ‘लालपरी’ची ४८ तासांची ‘विश्रांती’; मुरबाडला मेकॅनिक मिळेना, महामंडळाच्या सुस्त कारभारावर प्रवाशांचा तीव्र संताप

जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक १४/१०/२०२६.
मुरबाड:
‘ आपली एसटी, लोकांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (MSRTC) एक अत्यंत भोंगळ आणि धक्कादायक कारभार मुरबाड तालुक्यात समोर आला आहे. मुरबाड - फांगळोशी (Murbad - Fangaloshi) या ग्रामीण मार्गावरील एसटी बस (क्रमांक MH 20 BL 1388) तांत्रिक बिघाडामुळे काल दुपारी ३ वाजल्यापासून रस्त्याच्या अगदी मधोमध बंद पडली आहे. मात्र, तब्बल ४८ तास उलटून गेले तरी महामंडळाच्या वतीने या बसला हटवण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी एकही मेकॅनिक घटनास्थळी पाठवण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या याm सुस्त आणि बेजबाबदार भूमिकेमुळे प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
भर रस्त्यात बस अडकल्याने अपघाताची भीती
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस काल दुपारी फांगळोशीच्या दिशेने जात असताना अचानक बंद पडली. रस्ता अरुंद असल्याने आणि बस अगदी रस्त्याच्या मधोमध उभी राहिल्याने या मार्गावरील इतर वाहनांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, महामंडळाला याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे चित्र दिसत आहे.
४८ तास झाले, तरी यंत्रणा ढिम्मच!
स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी बस बंद पडल्याबाबत तातडीने मुरबाड आगार प्रशासनाला माहिती दिली होती. परंतु, दोन दिवस संपत आले तरी कोणतीही तांत्रिक मदत किंवा क्रेन घटनास्थळी पोहोचलेली नाही. "रस्त्याच्या मधोमध बस बंद पडून ४८ तास झाले आहेत. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत असून, एसटी महामंडळाने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन काळजीपूर्वक काम करावे," अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
ग्रामीण भागातील प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाणारी एसटी अशा प्रकारे दोन-दोन दिवस बेवारससारखी रस्त्यावर पडून राहिल्याने महामंडळाच्या नियोजनाचे धिंडवडे निघाले आहेत. आता या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठ अधिकारी संबंधित ढिम्म प्रशासनावर आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📲Get App