🔥 ट्रेंडिंग फिरोजाबाद में रामलीला मंचन से पहले सफा... दक्षिण भारतीय फ़िल्में 'दासरा' और 'बाह... रूबीओ ने रिलींस के साथ वेंनेज़ुएला कच्... सीजेपी के नेता सौरव दास और आशुतोष रांक... टिप्रा मोथा MLA ने दिल्ली में त्रिपुरा... सीएम सुखु चंबा में होली समारोह में भाग...
21 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
सरकारी योजना

आमदार मा श्री राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते शहाद्यातील दोन महत्वाच्या फुलांचे भव्य लोकार्पण

✍️ रिपोर्टर: Ashok Patil 🗓 20 अक्टू. 2026, 10:31 PM 👁 35
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

आमदार मा श्री राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते शहाद्यातील दोन महत्वाच्या फुलांचे भव्य लोकार्पण

शहादा शहर हे एक दळणवळणासाठी महत्त्वाचे ठिकाण ठरते शहादा हे मध्य प्रदेश गुजरात ह्या राज्यांना जोडणारे महत्त्वाचे ठिकाण ठरते काही महिन्यापासून शहाद्या तालुक्यातील महत्त्वाच्या दळणवळणाचे दोन पुलांचे काम सुरू होते त्यातील एक म्हणजे गोमाई नदीवरील तिखोरा पुलाचे काम यासाठी जवळजवळ वीस कोटी रुपये मंजूर झालेले होते ह्या कामाची मुदत 26 महिन्यांची होती परंतु काम हे चार महिन्या आधी पूर्ण झाले हे शहाद्याकरांसाठी खूप महत्त्वाची बाब आहे कारण पुलाचे काम चालू होते म्हणून सर्व वाहतूक वेगळ्या मार्गांनी वळवण्यात आलेली होती त्यामुळे लोकांना अडचणीच्या सामना करावा लागत होता त्यामुळे प्रवासाला लागणारा वेळ आणि इंधनाच्या खर्च वाढत होता त्यामुळे सर्वच लोकं हैराण झाले होते विशेषता शाळकरी व महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी व नोकर वर्ग ह्यांना पुलाचे महत्व जास्त आहे तसेच शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनाही हा पूल उपयोगी असतो तसेच व्यापाऱ्यांसाठी सुद्धा दळणवळणासाठी हा खूपच महत्त्वाचा पूल आहे तीखोरा पुल हा शहाद्याला जोडणारा एक महत्त्वाच्या दुवा आहे तसेच शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे येथील भेंडवानाला या पुलाचेही लोकार्पण झाले त्यामुळे लोकांना खूप दिलासा मिळाला त्या पुलाचे बऱ्याच दिवसापासून काम रखडले होते ह्या भव्य पुलाच्या लोकार्पण सोहळा आमदार माननीय श्री राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला यावेळी भाजपा प्रदेश सदस्य माननीय बापूसाहेब दीपक जी पाटील भाजपा जिल्हा अध्यक्ष माननीय निलेश भाऊ माळी जिल्हा उपाध्यक्ष माननीय प्राचार्य मकरंद पाटील माजी जिल्हा परिषद सभापती सौ कांचनताई पाटील शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ माधवी ताई पाटील लोणखेडा मंडळ अध्यक्ष माननीय नितीन पाटील म्हसावद मंडळ अध्यक्ष माननीय विश्वास ठाकरे तसेच मोहिदा सरपंच सौ श्रद्धा ताई पुष्पराज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या भव्य पुलामुळे परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होऊन नागरिकांना विकासाला नवीन गती मिळाली
📲Get App