🔥 ट्रेंडिंग UAE ਨੂੰ 7 ਵਿਕਟਾਂ ਨਾਲ ਹਰਾ ਕੇ ਭਾਰਤ ਸੈਮੀਫ... ਬਾਬਾ ਰਾਮਦੇਵ ਦੇ ਬਿਆਨ 'ਤੇ ਬੋਲੇ ਧੀਰੇਂਦਰ ਸ... వైసీపీ అభ్యర్థులకు మద్దతుగా రంగంలోకి ద... एनटीके ने विधायक की गिरफ्तारी की मांग... गुजरात उपमुख्यमंत्री ने राष्ट्रीय विज्... कर्नाटक ने 6,342 नई ग्रामीण पुस्तकालय...
24 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

वाशिम मध्ये मोबाईल युनियन अध्यक्षपदी नितीन शिवलकर यांची निवड झाली.

✍️ रिपोर्टर: Rashtrapal Dilip Sarkate 🗓 24 नव. 2026, 09:06 PM 👁 18
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मोबाईल युनियन वाशिमच्या अध्यक्षपदी नितीन शिवलकर यांची निवड!.वाशीम जिल्हा प्रतिनिधी:
उपाध्यक्षपदी गणेश मालक, तर सचिवपदी ॲड. अमित बागल यांची नियुक्ती
वाशिम, प्रतिनिधी : वाशिम शहरातील मोबाईल व्यावसायिकांना एकत्रित आणून त्यांच्या व्यावसायिक समस्या व अडचणींना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मोबाईल युनियन वाशिमच्या अध्यक्षपदी नितीन शिवलकर यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी गणेश मालक आणि सचिवपदी ॲड. अमित बागल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे शहरातील मोबाईल व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रांतून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मोबाईल व्यवसाय हा आजच्या आधुनिक युगातील महत्त्वाचा व्यावसायिक घटक बनला आहे. मोबाईल विक्री, दुरुस्ती, अॅक्सेसरीज तसेच मोबाईलशी संबंधित विविध सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना अनेकदा वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत सर्व व्यावसायिकांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन परस्पर सहकार्य, समन्वय आणि एकजुटीच्या माध्यमातून व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने मोबाईल युनियन वाशिमच्या माध्यमातून संघटनात्मक कार्याला चालना देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
नवनियुक्त अध्यक्ष नितीन शिवलकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपाध्यक्ष गणेश मालक आणि सचिव ॲड. अमित बागल यांच्या सहकार्याने मोबाईल व्यावसायिकांचे संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. शहरातील मोबाईल व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या समस्या संबंधित स्तरावर मांडणे, व्यावसायिकांमध्ये परस्पर विश्वास व सहकार्याची भावना निर्माण करणे, तसेच व्यवसायाच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविणे, या बाबींना संघटनेच्या कार्यात प्राधान्य दिले जाणार आहे.
या संघटनेच्या संचालक मंडळामध्ये गणेश खोटे, ज्ञानेश्वर गव्हाणे, सोहेल शेख , गणेश डाखोरे, गणेश भोयर, रोहित वंजानी, सुनील चांदवणी आणि प्रतीक सरनाईक यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच संघटनेच्या सल्लागारपदी निर्मल बसंतवाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मोबाईल युनियनच्या माध्यमातून शहरातील सर्व मोबाईल व्यावसायिकांना एकत्र आणून त्यांच्या हिताचे निर्णय घेणे, व्यापारी बांधवांमध्ये संवाद वाढविणे, व्यवसाय संध्रबातीलनवीन माहिती व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि व्यावसायिक क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण करणे, अशा विविध विषयांवर संघटना काम करणार आहे.
नवनियुक्त अध्यक्ष नितीन शिवलकर, उपाध्यक्ष गणेश मालक, सचिव ॲड. अमित बागल, संचालक मंडळातील सर्व सदस्य आणि सल्लागार निर्मल बसंतवाणी यांच्या सामूहिक सहकार्याने मोबाईल युनियन वाशिम आगामी काळात संघटनात्मक कार्याचा विस्तार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ व सल्लागार यांचे शहरातील व्यापारी बांधवांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत. मोबाईल व्यावसायिकांच्या एकजुटीचे आणि सहकार्याचे नवे पर्व या संघटनेच्या माध्यमातून सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
📲Get App