🔥 TRENDING Jharkhand Police Investigate Brutal Mu... Keenan-Reuben Murder: Court Cuts Convi... Keenan-Reuben murder shocks village, p... Demonetisation's Impact on India's Tax... Bangladesh's Ex-Premier Hasina Vows De... Jaishankar urges Commonwealth nations...
06 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
दिनांक: ९ सप्टेंबर २०२६.मुरबाड तालुक्यात 'सामाजिक समता वारी-दिंडी सोहळा' आणि प.पू. रुद्रीनाथ बाबांच्या ३० व्या पुण्यतिथी महोत्सवाचे जंगी आयोजन!

दिनांक: ९ सप्टेंबर २०२६.मुरबाड तालुक्यात 'सामाजिक समता वारी-दिंडी सोहळा' आणि प.पू. रुद्रीनाथ बाबांच्या ३० व्या पुण्यतिथी महोत्सवाचे जंगी आयोजन!

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 09 Sep 2026, 02:32 PM 👁 123
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विशेष वृत्तसिटीझन रिपोर्टर: काशिनाथ देसलेविशेष प्रतिनिधी: किशोर पवार, मुरबाडदिनांक: ९ सप्टेंबर २०२६.मुरबाड तालुक्यात 'सामाजिक समता वारी-दिंडी सोहळा' आणि प.पू. रुद्रीनाथ बाबांच्या ३० व्या पुण्यतिथी महोत्सवाचे जंगी आयोजन!मुरबाड:नाथ संप्रदायाचे कोकणातील आद्य प्रवर्तक योगेंद्रमुनी गुरु शिलनाथ बाबा यांचे पट्टशिष्य प.पू. रुद्रीनाथ बाबा यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त शहापूर आणि मुरबाड परिसराच्या सीमेवर असलेल्या श्रीक्षेत्र टाकेश्वर धर्मपीठ येथे भव्य धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सामाजिक एकतेचा आणि समतेचा संदेश देणारी भव्य 'सामाजिक समता-वारी दिंडी' काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.असा असेल सोहळ्याचा भव्य वेळापत्रक:येत्या शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी पहाटे ५:०० वाजता काकड आरतीने या सोहळ्याचा प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी ६:०० ते ७:०० या वेळेत श्री हनुमान अभिषेक पार पडणार आहे. सकाळी ठीक ७:०० वाजता कवडास येथून दिंडीचे श्रीक्षेत्र टाकेश्वर मठाकडे प्रस्थान होईल. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरीनामाच्या जयघोषात ही दिंडी लिबर्टी, सापगाव, शेरेपाडा, शेलवली, धसई, शेणवे आणि कुलवंत या गावांमधून मार्गक्रमण करणार आहे.वेहळोलीत रंगणार भव्य रिंगण सोहळा:या वारीचे मुख्य आकर्षण असलेला भव्य रिंगण सोहळा दुपारी ३:०० वाजता वेहळोली येथील कै. हरिश्चंद्र किरपण मैदानावर रंगणार आहे. या ठिकाणी वारकऱ्यांचे पारंपरिक खेळ आणि अभंग-भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी ७:०० वाजता दिंडीचे टाकेश्वर मठात आगमन होईल, जिथे महाप्रसाद आणि संत दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येईल.समतेचा संदेश आणि आवाहन:"जात-पात, भेदभाव आणि सामाजिक विषमता बाजूला ठेवून सर्वांनी समाजात एकत्र यावे, हाच या वारी-दिंडीचा मुख्य उद्देश आहे," असे प्रतिपादन आयोजक बाळाराम गोळे यांनी केले आहे. या सोहळ्यात परिसरातील सर्व साधू-संत, महंत, वारकरी आणि भाविक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.परिसरातील या मोठ्या धार्मिक सोहळ्याची जय्यत तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
📲Get App