🔥 TRENDING NEED24 NEWS | लुधियाना लुधियाना नॉर्थ... વિરમગામમાં દિવાળીના તહેવાર પૂર્વે ફૂડ... वाराणसी के समाजसेवी अमरीश सिंह भोला को... CJP Leaders Questioned 4 Hours by Delh... Trump Warns Iran: 'You'll Know Soon En... Chennai's 'Transparent' Phase Ends as...
06 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
.दिनांक: ८ सप्टेंबर २०२६मुरबाड तालुक्यात खड्ड्यांचे साम्राज्य; रस्ते की अपघाताचे सापळे? नागरिक आणि वाहनचालक हवालदील
Local

.दिनांक: ८ सप्टेंबर २०२६मुरबाड तालुक्यात खड्ड्यांचे साम्राज्य; रस्ते की अपघाताचे सापळे? नागरिक आणि वाहनचालक हवालदील

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 08 Sep 2026, 02:47 PM 👁 114
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
Need 24 न्यूजसिटीझन रिपोर्टर: काशिनाथ देसले,तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड.ठाणे.दिनांक: ८ सप्टेंबर २०२६मुरबाड तालुक्यात खड्ड्यांचे साम्राज्य; रस्ते की अपघाताचे सापळे? नागरिक आणि वाहनचालक हवालदील. मुरबाड (ठाणे):ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य महामार्गांसह अंतर्गत रस्त्यांची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाळा संपत आला तरी रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य कायम असून, हे रस्ते आता प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहेत. खड्ड्यांमुळे दररोज होणारे लहान-मोठे अपघात आणि वाहतूक कोंडी यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालक पूर्णपणे हवालदील झाले आहेत. मुख्य महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांची चाळणकल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ च्या काँक्रिटच्या कामावर तसेच मुरबाडहून समृद्धी महामार्गाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या जोड रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच, शहापूर-मुरबाड-खोपोली मार्गाचीही दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी वळणावर आणि चढणीच्या भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहेत. औद्योगिक वसाहतींच्या (MIDC) शेवटच्या टप्प्यात माती आणि चिखलामुळे दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. तालुक्या अंतर्गत येणारे रायते, उल्हास नदीचा पूल, धसई, किन्हवली आणि लगतच्या ग्रामीण भागातील रस्तेही पूर्णपणे उखडले आहेत. नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि आंदोलनाचा इशारारस्त्यांची केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता त्यांचे दर्जेदार डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. "अनेक ठिकाणी अपूर्ण कामांमुळे आणि खड्ड्यांमुळे प्रवास करणे जिकीरीचे झाले असून, प्रशासनाने यावर तात्पुरती माती न टाकता कायमस्वरूपी तोडगा काढावा," असा सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे. या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कधी लक्ष देणार? "प्रशासन एखादा मोठा जीव जाण्याची वाट पाहत आहे का?" असा संतप्त सवाल मुरबाडमधील त्रस्त जनतेकडून केला जात आहे.
📲Get App