🔥 TRENDING વાગર, સલાદરા કબ્રસ્તાનમાં હઝરત મજલેસાબ... गुलजारी प्वाइंट कोचिंग सेंटर, बेलाव कै... ગાંધીનગર મહાનગર વોર્ડ 3ની કોર્પોરેટર સ... પ્રધાનમંત્રી નરેન્દ્ર મોદીએ નવસારીમાં... *विशेष मतदाता जागरूकता एवं स्वीप कार्य... प्रजापति समाज से एम एल सी बनने के बाद...
08 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

ठाणे महानगरपालिकेच्या वागळे प्रभाग समितीमधील मालमत्ता कर विभागाच्या शिपायाला २५०० रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 08 Sep 2026, 08:04 PM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
ठाणे महानगरपालिकेच्या वागळे प्रभाग समितीमधील मालमत्ता कर विभागाच्या शिपायाला २५०० रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. मालमत्ता कराच्या पावतीवर नावात बदल करून प्रमाणपत्र देण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.ठाणे:तक्रारदाराच्या कंपनीच्या कार्यालयाचे मालमत्ता कर प्रमाणपत्र द्यायचे होते. यासाठी शिपाई देवेंद्र द्वारकानाथ कोळी (वय ४३) याने लाच मागितली. त्याने शासकीय शुल्काव्यतिरिक्त ३,००० रुपयांची मागणी केली होती. शेवटी २,५०० रुपयांची लाच घेण्याचे ठरले. तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रीतसर तक्रार केली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७ सप्टेंबर रोजी वागळे प्रभाग समिती कार्यालयात सापळा रचला. दुपारी दीडच्या सुमारास तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना देवेंद्र कोळी याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक भरत एकनाथ जाधव आणि त्यांच्या पथकाने केली. आरोपीविरुद्ध ठाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.दिनांक: ०८/०९/२०२६न्युज रिपोर्टर: किशोर पवारसिटीझन रिपोर्टर: काशिनाथ देसले, ठाणे.
📲Get App