Viral & Trending
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात लाचखोरी; महसूल सहाय्यक आणि शिपायाला ५० हजारांची लाच घेताना ACB ने पकडले.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात लाचखोरी; महसूल सहाय्यक आणि शिपायाला ५० हजारांची लाच घेताना ACB ने पकडले२४ न्यूज (24News) वृत्तसेवासिटी रिपोर्टर: काशिनाथ देसले, ठाणेसिटीझन रिपोर्टर: किशोर पवार, मुरबाडदिनांक: १३ सप्टेंबर २०२६ठाणे: सरकारी काम करून देण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि एका शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे ठाणे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ठाण्यातील गजबजलेल्या जांभळी नाका परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) हा सापळा रचला होता. एका तक्रारदाराचे शासकीय काम करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराच्या तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने जांभळी नाका येथे गुप्तपणे मोहीम आखली आणि लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहाथ बेड्या ठोकल्या.या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:गणेश बालकृष्ण मोरे (वय ५२) – महसूल सहाय्यक, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयखालिद गुलाब शेख (वय ५३) – शिपाई, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयया दोघांवरही लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.