🔥 TRENDING INDIA Bloc Looks to Himachal, Punjab f... Mohali Consumers Federation Protests O... Mohali Celebrates Valmiki Jayanti with... Lucknow sunsani case Manipur CM Offers Condolences to Famil... CRPF Seizes Kuki-Zo Insurgent Camp in...
27 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Health

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या अत्याधुनिक सुविधांसाठी २०५ कोटी; हृदयरोग, मेंदूशस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागांसह विविध सुविधांचा समावेश.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 27 Oct 2026, 02:32 AM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४न्यूज :
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक २७/१०/२०२६
ठाणे विशेष वृत्त.
ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या अत्याधुनिक सुविधांसाठी २०५ कोटी; हृदयरोग, मेंदूशस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागांसह विविध सुविधांचा समावेश
ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या ९०० खाटांच्या विस्तारित सुविधांमधून रुग्णांना आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, वैद्यकीय उपकरणे आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी २०५ कोटी रुपयांच्या निधीला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा रुग्णालयासाठी २०५ कोटींचा निधी मंजूर, मिळणार अत्याधुनिक आरोग्य सुविधा
सविस्तर वृत्त =: ठाणे : ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या ९०० खाटांच्या विस्तारित सुविधांमधून रुग्णांना आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, वैद्यकीय उपकरणे आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी २०५ कोटी रुपयांच्या निधीला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. रुग्णालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून काही उपकरणे बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबरोबरच उर्वरित अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री आणि आवश्यक सुविधांसाठी मंजूर झालेल्या निधीमुळे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ९०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले असून, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच भरीव निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. हृदयरोग, मेंदूविकार, अपघातग्रस्त रुग्णांवरील उपचार, डायलिसिस, अतिदक्षता आणि अन्य विशेष वैद्यकीय सेवांसाठी आवश्यक सुविधा येथे विकसित करण्यात येणार आहेत. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी अधिक सक्षम सार्वजनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासोबतच जिल्ह्यातील आरोग्यसेवेची क्षमता वाढण्यासही मदत होणार आहे.
निधी वापराचे नियोजन
– वैद्यकीय उपकरणे, यंत्रसामग्री आणि पायाभूत सुविधांसाठी २०५ कोटी ८० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याची खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक निविदा आणि अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.
या निधीतून रुग्णालयात हृदयरोगावरील उपचारांसाठी प्रगत कॅथलॅब, हृदयशस्त्रक्रियागृह आणि हृदयरोग अतिदक्षता विभागाची सुविधा उभारण्यात येणार आहे. यासाठी एकत्रित ४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मेंदूविकार आणि मेंदूवरील शस्त्रक्रियांसाठी अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह व आवश्यक उपकरणांसाठी १५ कोटी रुiपये, स्त्रीरोग शस्त्रक्रियागृहांसाठी ९ कोटी ८० लाख रुपये आणि अपघातग्रस्त रुग्णांवरील तातडीच्या उपचारांसाठी ट्रॉमा शस्त्रक्रियागृहाच्या सुविधेसाठी ९ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद आहे.
📲Get App