Lifestyle
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा स्तुत्य पुढाकार; मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ३४.२३ लाखांचा निधी सुपूर्द.
नीड २४ न्यूज महाराष्ट्र
विशेष वृत्त : मुरबाड, ठाणे
दिनांक : १०/११/२०२६
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले (ठाणे) सह किशोर पवार (मुरबाड)
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा स्तुत्य पुढाकार; मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ३४.२३ लाखांचा निधी सुपूर्द
मुरबाड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (TDCC Bank) मदतीचा हात पुढे केला आहे. बँकेच्या वतीने ₹३४,२३,८३०/- (अक्षरी रुपये चौतीस लाख तेवीस हजार आठशे तीस मात्र) इतका निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या या मदतीसाठी बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन दिले असून, संचालक मंडळाने आपल्या एका बैठकीचा भत्ता एकत्रित करून ही भरीव रक्कम उभी केली आहे. या निधीचा धनादेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मुरबाडचे लोकप्रिय आमदार मा. श्री. किसनजी कथोरे साहेब यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री. अरुणजी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे अध्यक्ष श्री. रविंद्रजी घोडविंदे, TDCC बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. दिनेश कथोरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीकांतजी पठारे, तसेच बँकेचे संचालक सौरभ सुभाष पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. बँकेच्या या संवेदनशील व सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.