🔥 ट्रेंडिंग मां बड़ी बिजासन से नालेपार की कन्याओं... भट्ठा दुर्गाबाड़ी मंदिर में पूजा, सुख-... राज्यातील दुष्काळावर सरकार ॲक्शन मोडवर... वापी स्थित मेडटेक लाइफ प्राइवेट लिमिटे... पटना में विधायकगण एवं कार्यकर्ताओं से... પ્રાકૃતિક ખેતીથી સમૃદ્ધિ તરફ: મહિલા ખે...
15 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

शहादा नगरपालिकेच्या विकासासाठी निधी वाटपात भेदभाव.

✍️ रिपोर्टर: Ashok Patil 🗓 15 अक्टू. 2026, 03:38 PM 👁 43
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शहादा नगरपालिकेला निधी न मिळाल्यामुळे नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन

शहाद्याच्या विकासाचा निधी अडवला का? जिल्हा नियोजन समितीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू
नंदुरबार जिल्हा नियोजन समितीकडून (DPC) शहादा नगरपालिकेला विकास निधीतून एकही रुपया न मिळाल्याने नागरिकांवर आणि शहादा शहरावर मोठा अन्याय झाला आहे. या अन्यायाविरोधात प्रशासनाला जागे करण्यासाठी आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या व मुद्दे
शहादा पालिकेला हक्काचा विकास निधी तातडीने मंजूर करा.
शहरातील खड्डेमुक्त रस्ते आणि मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लावा.
कोट्यवधींच्या रखडलेल्या प्रस्तावांवर तातडीने निर्णय घ्या
नागरिकांना आवाहन
हे लाक्षणिक उपोषण आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शहादा शहर, तालुका आणि परिसरातील सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन उपोषणकर्त्यांनी केले
📲Get App