🔥 TRENDING હડિયોલ ગામની પીએમશ્રી-ગુજરાત પ્રાથમિક... *সাইবার প্রতারণার ৪ লক্ষ ১৪ হাজার টাকা... குடியாத்தம் நகரில் அகில பாரதி மக்கள் ச... Saras Mela showcasing rural produce an... Patna High Court issues notice to judg... Bihar Floods Continue to Haunt Residen...
19 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

प्राथमिक आरोग्य केंद्र कजगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 19 Sep 2026, 10:24 PM 👁 48
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सेवा संकल्प सप्ताह व श्री गणेशा आरोग्याचा अभियानांतर्गत

प्राथमिक आरोग्य केंद्र कजगांव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

सेवा संकल्प सप्ताह व श्री गणेशा आरोग्याचा अभियानांतर्गत आज प्राथमिक आरोग्य केंद्र कजगाव ता. भडगाव येथे भव्य रक्तदान शिबिर व राष्ट्रीय कुटंब कल्याण कॅम्प संपन्न झाले.सदर रक्तदान शिबिराचे आयोजन भडगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.समाधान वाघ,प्राथमिक आरोग्य केंद्र कजगांव वैद्यकीय अधिकारी डॉ.दिप्ती मगर डॉ. प्रियंका पाटील डॉ श्रीकांत मराठे आरोग्य निरीक्षक व अजित राजगुडे आरोग्य निरीक्षक व उमेश महाजन औषधं निर्माण अधीकारी यांच्या सूचनेनुसार करण्यात आले.जळगाव येथील रेडप्लस ब्लड सेंटर यांच्या माध्यमातून हे शिबिर घेण्यात आले.सदर प्रसंगी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन झाले.आलेल्या सर्व मान्यवरांचे प्राथमिक आरोग्य केंद्र कजगांव च्या वतीने शब्द सुमनानी स्वागत करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी कजगांव ग्रामपंचायतचे सरपंच, रघुनाथ महाजन व उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, जेस्ट पत्रकार प्रमोद ललवाणी अनिल पाटील, टेलर अनिल महाजन, संजय महाजन व सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते. आजच्या रक्तदान शिबिरात 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान यशस्वी होण्यासाठी कजगांव येथील सर्व अधिकारी व आरोग्य सेवक व आरोग्य सेविका गटप्रवर्तक.व सर्व आशा सेविका यांनी प्रचंड मेहनत घेतली. रक्तदान शिबिर अतिशय उत्कृष्टपणे राबवल्यामुळे रेडप्लस ब्लड सेंटर जळगाव यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र कजगांव यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.व तसेच आज रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय कुटंब कल्याण कॅम्प घेण्यात आला त्या कॅम्प मध्ये 10 महिलांनचे (कुटुंब नियोजन )ऑपरेशन करण्यात आले
📲Get App