🔥 ट्रेंडिंग एनईसी सचिव ने नागालैंड कॉफी की व्यावसा... नागा छात्र समूह ने नगालैंड में स्वायत्... राज्य के पुलिस थानों में बच्चों की मदद... मुख्यमंत्री ने राज्य में अपराध के खिला... जयपुर में ANTF की कार्रवाई, 100 करोड़... सेवा संकल्प अभियान के तहत विकासखंड स्त...
03 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
पिंपळगाव काळे येथील सेंट्रल बँकेच्या मनमानी विरोधात शेतकरी संतप्त...!
राजनीति

पिंपळगाव काळे येथील सेंट्रल बँकेच्या मनमानी विरोधात शेतकरी संतप्त...!

✍️ रिपोर्टर: Pavan Ajabarav Thakare 🗓 02 अक्टू. 2026, 10:45 PM 👁 16
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पिंपळगाव काळे येथील सेंट्रल बँकेच्या मनमानी विरोधात शेतकरी संतप्त...!

पवन ठाकरे


जळगाव (जा.): पिंपळगाव काळे येथील सेंट्रल बँकेमध्ये अनेक गावांचा समावेश असून शेतकरी खातेधारकांची संख्या मोठी आहे.सध्या परिस्थितीला शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात असताना पिक कर्ज वाटपात सेंट्रल बँकेचे वेगवेगळे निकष पाहता शेतकऱ्यांना खुप त्रास सहन करावे लागत आहेत.

यामध्ये विशेष करून सामाईक सातबाऱ्यातील क्षेत्रफळामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज देत असताना सेंट्रल बँक वेगवेगळे नियम लावत असल्याने अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिल्याचे दिसुन येत आहे.

सदर बाब काही शेतकऱ्यांनी युवा आंदोलक अक्षय पाटील यांना सांगितले असता त्यांनी दिनांक 30/9/2026 रोजी शेतकऱ्यांसमवेत सेंट्रल बँकेमध्ये धाव घेतली व बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना होत असलेला त्रास सांगितला व त्यानंतर तहसीलदार साहेब जळगाव (जा.) यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा घडवून आणली.

तसेच बँकेने चुकीचे निकष बदलले नाही व शेतकऱ्यांना हा त्रास दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा अक्षय पाटील यांनी चर्चे दरम्यान दिला.
📲Get App