🔥 ट्रेंडिंग भारत ने नाभिकीय कार्यक्रम के लिए यूरेन... गार्हवा पुलिस ने इरानी मूल के परिवारों... झारखंड के राज्यपाल संतोष गंगवार और सीए... ईडी ने पिनारायि विजयन को निशाना बनाया:... केरल के व्यक्ति को टूर एजेंसी की असफल... नीलम्पेरूर में पदायनी महोत्सव ने एकता...
14 सित. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
शिक्षा

पंचायत समिती मुरबाड शिक्षण विभाग आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५/२६आयोजित करण्यात आला.

✍️ रिपोर्टर: Kashinath Dhondu Desale 🗓 13 सित. 2026, 04:00 PM 👁 211
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार, समाजाच्या प्रगतीचा आधार
आज शनिवार दिनांक 12/09/2026 रोजी पंचायत समिती मुरबाड शिक्षण विभाग आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा उमरोली येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत गाऊन केली. स्वरसाथ उमरोली शाळेचे मुख्याध्यापक श्री. विलास चौधरी सर यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी श्री. मधुकर घोरड साहेब.यांनी अत्यंत समर्पक शब्दात केले. माझ्या तालुक्यातील शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात कुठेही कमी पडणार नाही. अतिशय दुर्गम भागात सेवा देणारे शिक्षक शिष्यवृत्ती व इततर शैक्षणिक कामकाज अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत आहे.असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. आपल्या विभागाचा लेखा जोखा त्यांनी या वेळी मांडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मिशन भरारी उपक्रमाअंतर्गत गेल्या वर्षी जे विद्यार्थी इस्रो येथे गेले होते त्या विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाने करण्यात आली. तालुक्यातील इयत्ता 4थी/5वी व 7वी/8वी च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळविले त्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. तदनंतर आदर्श शिक्षक पुरस्कारार्थीना गौरवण्यात आले. एकूण अकरा बिटातून अकरा पुरस्कार मुरबाड विधानसभेचे आदरणीय आमदार किसनजी कथोरे साहेब,ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष श्री. सुभाषदादा पवार,जिल्हा परिषद माजी सदस्य श्री. उल्हासभाऊ बांगर व मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले.
आजचे पुरस्कारार्थी
1)श्री. प्रभाकर भास्कर पवार जि. प शाळा किशोर
2)श्री.प्रदिप मारुती सासे
जि प शाळा शिरटवाडी
3)श्री.योगेश लक्ष्मण चौधरी
जि प शाळा टेंभरेवाडी
4) श्री.सुनील सखाराम वाळिंबे
जि प शाळा आंबेगाव
5)श्री.बाळू भानुदास पांढरे
जि प शाळा केव्हारवाडी
6)सौ.माधुरी शिवाजी तुंगार
जि प शाळा विढे
7) सौ.सुलक्षणा विक्रम जोगदंड
जि प शाळा वाकळवाडी
8) सौ.नंदा सखाराम वाळुंज
जि प शाळा धानिवली
9) सौ.एकता एकनाथ मुरबाडे
जि प शाळा साखरे
10) सौ.पद्मावती विनायक जाधव
जि प शाळा वडवली
11) सौ.अर्चना देवराम अहिनवे
जि प शाळा शिवेचीवाडी
ह्या शिक्षकांचा सन 2025/26चे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.
आदरणीय आमदार कथोरे साहेब ,सुभाषदादा पवार , उल्हासभाऊ बांगर यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या .
या प्रसंगी रामभाऊ दळवी,प्रकाश पवार मोहन सासे,सुरेश बांगर सर, स्वरा चौधरी, किसन कथोरे,मनोज देसले,यादव पवार,संजय घागस, भगवान भगत, कृष्णकांत मलिक,वसंत घावट, पद्माकर यशवंतराव,मंगेश इसामे, शेखर वाकचौडे, यशवंत वाघ
इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हसा शाळेचे मुख्याध्यापक श्री.शरद चौधरी सर यांनी केले.
📲Get App