🔥 TRENDING বিজেপি এন্টালি মন্ডল সভাপতি প্রশান্ত দ... శోభనాద్రిపురం: శ్రావణ్ కుమార్ గారు దసర... रामकृपाल यादव ने जगनपुरा में कन्या पूज... Uttarakhand Man Evades Traffic Ticket,... Emirates Flight to Dubai Delayed at De... Uddhav Thackeray Criticizes Delhi Prot...
18 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

नवरात्र उत्सवानिमित्त नामस्मरण सोहळा

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 18 Oct 2026, 02:32 PM 👁 38
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

महानुभाव पंथ नामस्मरण सोहळा कार्यक्रम

महानुभाव पंथाचे महातीर्थ क्षेत्र असलेले डोमेग्राम येथे नवरात्र उत्सवानिमित्त परमेश्वराच्या नामस्मरणासाठी हजारो भाविक दाखल झाले आहेत येथील राजमठ गुंफा स्थान व छिन्नस्थळी ही महानुभाव पंथीयांसाठी अत्यंत पवित्र व श्रद्धेची स्थाने मानले जातात या ठिकाणी परमेश्वराचे नामस्मरण व भक्ती केल्याने मनशांती लाभते आणि मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे डोमेग्राम हे श्रीरामपूर पासून २० किलोमीटर तर नेवासापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे निसर्गरम्य परिसर आणि धार्मिक वातावरण यामुळे या तीर्थक्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मुंबई पुणे नागपूर दिल्ली आदी शहरांचं विविध भागातून भाविक येथे दर्शनासाठी येतात विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक परमेश्वराच्या नामस्मरणासाठी येथे उपस्थित राहतात नवरात्र उत्सवाच्या काळात अनेक भाविक दहा दिवस येथे मुक्कामी राहून परमेश्वराचे नामस्मरण भजन पूजन व भक्तीमध्ये तल्लीन होतात दैनंदिन जीवनातील धावपळीतून काही काळ दूर राहून अध्यात्मिक साधन ना करण्याची संधी भाविकांना या ठिकाणी मिळते परमेश्वराच्या सानिध्यात आणि निसर्ग रम्य वातावरणात दिवस कसा निघून जातो हेही भाविकांना जाणवत नाही अशी भावना अनेक जण व्यक्त करतात डोमेग्राम येथे मंदिर व आश्रम परिसरात भाविकांच्या निवासासाठी मोठी व्यवस्था उपलब्ध या नवरात्र उत्सवाच्या दहा दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन परमपूज्य परम महंत प्रभाकर दादा तसेच तपस्विनी सविताबाई दीदी राजमठ यांनी केली आहे नवरात्र उत्सवाच्या दहा दिवसाच्या कालावधीत अन्नदानाचे कार्यही मोठ्या प्रमाणावर केले जाते त्यामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांना निवास व भोजनाची सुविधा मिळते धार्मिक श्रद्धा सेवाभाव आणि सामूहिक भक्ती यांच्या सुंदर संगम यातील तक्षेत्री अनुभवायला मिळतो मानवा पंथाच्या पवित्र तीर्थक्षेत्राला पिंपळोद येथील पत्रकार रमेश पाटील हे देखील उपस्थित आहेत तसे त्यांच्यासोबत अनेक भाविक सदभक्त उपस्थित आहेत हा नामस्मरण सोहळा नऊ दिवसाच्या असून दहाव्या दिवशी प्रादेशिक विधीने समारोप होतो समारोपानंतर सर्व भक्त आपापल्या गावी परतीच्या प्रवासाला निघतात
📲Get App