🔥 ट्रेंडिंग अंतरिक्ष मेले में बच्चों ने देखा सफल र... मुंबई में टेंपो चालक को बाथरूम के पास... पंचकूला शाळेत 8 वर्षाच्या मुलाने 6 वर्... श्रीमाधोपुर के महात्मा गांधी पीजी महाव... तमिलनाडु में वापस 6 बजे की फिल्मों का... तमिलनाडु भर्ती प्रक्रिया पर एन.अनन्याम...
04 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

नवापूरमध्ये महिला सक्षमीकरणासाठी ‘उमेद दिवाळी फराळ महोत्सव’चे आयोजन

✍️ रिपोर्टर: Suman Gavit 🗓 04 नव. 2026, 03:26 PM 👁 13
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नवापूर येथे महिला स्वयंसहायता समूहांंच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘उमेद दिवाळी फराळ महोत्सव २०२६-२७’चे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांच्या स्वावलंबनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) नवापूर येथे ‘उमेद दिवाळी फराळ महोत्सव २०२६-२७’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष आणि पंचायत समिती नवापूर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून महिला स्वयंसहायता समूहांनी तयार केलेल्या विविध पारंपरिक दिवाळी फराळाच्या पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये चकली, लाडू, चिवडा आणि करंजी यांसारख्या विविध खाद्यपदार्थांचा समावेश आहे. महिलांनी स्वतः तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळाल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

तसेच ग्रामीण भागातील महिलांमधील उद्योजकता, आत्मविश्वास आणि आर्थिक स्वावलंबनाला प्रोत्साहन मिळणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांना ओळख मिळण्याबरोबरच स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे.

महिलांच्या हाताला काम, उत्पादनांना बाजारपेठ आणि कुटुंबाला आर्थिक आधार मिळवून देणारा ‘उमेद दिवाळी फराळ महोत्सव’ हा महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. तसेज करंजी बु, रायगण, उमराण, बिलमांजरे, चिंचपाडा, चितवी या प्रभागातील सर्व crp ग्रामसखी व गावनिहाय प्रभागसमन्व्यक यांच्या उपस्थितत पार पडले
📲Get App