🔥 ट्रेंडिंग સાબરકાંઠાના તલોદ GIDCની બંધ ફેક્ટરીમાં... राजेन्द्र नगर–भूंगरा में सूखे की चपेट... त्रिपुरा हाई कोर्ट ने एनएलयू रजिस्ट्रा... अगर्ताला में एआई प्रशिक्षण से महिलाओं... त्रिपुरा में 19 अवैध पुनर्वास केंद्रों... हिमाचल प्रायद्वीप ने केंद्र के साथ किश...
15 सित. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट; थायलंडच्या क्रमांकावरून फसवणुकीचा प्रयत्न .....!!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Dixit 🗓 15 सित. 2026, 03:20 PM 👁 14
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट; थायलंडच्या क्रमांकावरून फसवणुकीचा प्रयत्न .....!!!



विभागीय प्रतिनिधी

नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांचे नाव, पद आणि फोटो वापरून बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट तयार केले आहे.

या बनावट अकाउंटवरून नागरिकांशी संपर्क साधून मेसेज पाठवले जात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आले आहे. हे अकाउंट +66 92 455 6074 या थायलंडच्या मोबाईल क्रमांकावर तयार करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या क्रमांकावरून आलेला कोणताही कॉल किंवा मेसेजला उत्तर देऊ नये. तसेच आपली वैयक्तिक माहिती, आधार-पॅन सारखी कागदपत्रे, बँक खात्याचा तपशील, ओटीपी किंवा आर्थिक व्यवहारासंबंधी कोणतीही माहिती शेअर करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सुरू असलेले हे अकाउंट अधिकृत नाही. त्यामुळे येणाऱ्या संदेशांची शहानिशा केल्याशिवाय कोणतीही कृती करू नये. अशा प्रकारचा बनावट संपर्क झाल्यास त्याची माहिती तात्काळ संबंधित यंत्रणेला किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
📲Get App