🔥 TRENDING চীনা লাইটের দাপটেও হার না মানা পুরুলিয... చర్ల బస్టాండ్ సెంటర్లో ట్రాఫిక్ ఇబ్బంద... Rohit Sharma’s Run‑Out Turns the Tide... ભાવનગર માં એર શો નુ આયોજન Telangana Today Publishes Editorial "B... लोरमी न्यायालय ने शासकीय जमीन की हेराफ...
05 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

मध्य रेल्वे व खासदार सुनील तटकरे यांच्या बैठकीत कोकण प्रवाशांच्या मागण्या मांडल्या

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 05 Nov 2026, 04:12 PM 👁 17
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कोकण प्रवाशांच्या रेल्वे मागण्या चर्चा झाल्या.

5 नोव्हेंबर 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक व विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांच्या उपस्थितीत खासदार सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

बैठकीत जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन सखाराम जाधव आणि कोकण विकास समितीच्या वतीने श्री. अक्षय मधुकर महापदी उपस्थित होते. तसेच वरिष्ठ रेल्वे अधिकारी व DRM यांनीही चर्चा मध्ये सहभाग घेतला.

कोकण रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यात आली. प्रमुख मागण्या अशा होत्या: (१) मुंबई–चिपळूण दररोज नवीन एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी, ज्यामुळे खेड रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळेल; (२) वंदे भारत एक्सप्रेसचे १६ डब्यांमध्ये विस्तारीकरण, आणि (३) रत्नागिरी–दादर गाडीचे पुनर्संचलन.

या सर्व मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्रालय, नवी दिल्ली येथे आवश्यक चर्चा व पाठपुरावा करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या न्याय्य मागण्यांसाठी जल फाउंडेशन व कोकण विकास समितीचा पाठपुरावा यापुढेही सातत्याने सुरू राहील.
📲Get App