Health
मुरबाडकरांचा मुंबई-ठाण्याचा फेरा चुकणार! आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते अत्याधुनिक 'डायग्नोस्टिक सेंटर'चे भव्य लोकार्पण!
नीड २४ न्यूज महाराष्ट्र
दिनांक: ९ नोव्हेंबर २०२६
विशेष वृत्त – मुरबाड प्रतिनिधी
मुरबाडकरांचा मुंबई-ठाण्याचा फेरा चुकणार! आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते अत्याधुनिक 'डायग्नोस्टिक सेंटर'चे भव्य लोकार्पण!
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
दिनांक ९/११/२०२६
विशेष वृत्त
मुरबाड:
मुरबाड शहरात आरोग्य सेवेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल पडले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या उपचारांसाठी आणि तपासण्यांसाठी आता मुंबई, ठाणे किंवा कल्याण गाठण्याची गरज भासणार नाही. प्रेरणा संतोष पवार व मयुरेश निलेश भिसे यांनी मुरबाडकरांसाठी उभारलेल्या अत्याधुनिक 'मुरबाड डायग्नोस्टिक सेंटर'चे आणि नवीन सीटीस्कॅन मशीनचे भव्य उद्घाटन दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते अतिशय उत्साहात संपन्न झाले.
मुरबाड तालुक्यात हक्काच्या आणि अद्ययावत वैद्यकीय तपासणी केंद्राची मोठी अडचण होती. हीच गरज ओळखून सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा एकाच छताखाली आणि अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि रुग्णांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
"मुरबाडसारख्या ग्रामीण भागात अशा अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटरची नितांत गरज होती. प्रेरणा संतोष पवार यांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू करून समाजोपयोगी काम केले आहे, त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. या सेंटरमुळे सर्वसामान्य रुग्णांना वेळेत व कमी खर्चात अचूक निदान होण्यास मोठी मदत होईल."
— आमदार किसन कथोरे
या अत्याधुनिक सेंटरमधील प्रमुख सुविधा:
• सीटीस्कॅन व एक्स-रे: प्रगत तंत्रज्ञानाच्या मशिन्सद्वारे जागेवरच अचूक निदान.
• रक्त व इतर वैद्यकीय चाचण्या: सर्व प्रकारच्या लॅब टेस्ट एकाच छताखाली उपलब्ध.
• माफक दर: गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना परवडतील अशे कमी दर.
• मोफत रुग्णवाहिका: आणीबाणीच्या प्रसंगात रुग्णांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा आजपासूनच सुरू.
मान्यवरांची उपस्थिती:
या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, उल्हासभाऊ बांगर, राजेशदादा पाटील, रवींद्र घोडविंदे, गणपत विशे तात्या, गणेश कथोरे, नगराध्यक्ष मोहन गडगे, मुकेश विशे, दिपक पवार, जितेंद्र भावार्थे , हभप रामभाऊ दळवी, इंजि. चेतनसिंह पवार, दिपक खाटेघरे आणि किसन अनंता कथोरे यांसह परिसरातील अनेक मान्यवर, राजकीय पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.