🔥 TRENDING West Bengal to Bar New School Teachers... उघेती थाना चाचिपुर के पास मोटरसाइकिल ट... आजमनगर क्रिकेट टूर्नामेंट का फाइनल कल,... West Bengal Announces AIIMS Project fo... West Bengal BJP Leader Urges New SIR A... સુરતમાં એમ્બ્રોઇડરી કામદારોનું આંદોલન...
31 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

मुरबाड संगमेश्वर येथे एच. के. ग्रुपतर्फे पर्यावरणपूरक मखर सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा संपन्न; महिला कामगारांना ओळखपत्रांचे वाटप.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 31 Oct 2026, 08:40 PM 👁 16
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४न्यूज महाराष्ट्र विशेष वृत्त
मुरबाड, दिनांक ०१/११/२०२६.
मुरबाड संगमेश्वर येथे एच. के. ग्रुपतर्फे पर्यावरणपूरक मखर सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा संपन्न; महिला कामगारांना ओळखपत्रांचे वाटप
मुरबाड (प्रतिनिधी - किशोर पवार जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे
मुरबाड :गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने एच. के. ग्रुप ऑफ कंपनीजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'पर्यावरणपूरक मखर सजावट स्पर्धेचा' भव्य आणि दिमाखदार बक्षीस वितरण समारंभ मुरबाड येथील संगमेश्वर येथील देशमुख समाज हॉल (भाऊसाहेब देशमुख) बंदिस्त सभागृहात मोठ्या जल्लोषात पार पडला.
एच. के. ग्रुप ऑफ कंपनीजचे सर्वेसर्वा हरेश यशवंत खापरे व अश्विनी हरेश खापरे या दांपत्याच्या सामाजिक कार्यातून सरळगाव जिल्हा परिषद गटामध्ये सामाजिक बांधिलकीचा एक वेगळा ठसा उमटला आहे. "८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण" हे ब्रीद घेऊन त्यांची वाटचाल सुरू असून, गरजू गावांमध्ये बोअरवेल मारून पाण्याची सोय करणे तसेच महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे असे अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जात आहेत.
जिल्हा परिषद गटात घेण्यात आलेल्या या पर्यावरणपूरक मखर सजावट स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ३३,००० रुपये, २२,००० रुपये आणि ११,००० रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांना प्रत्येकी ५,००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
या भव्य सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत इमारत व बांधकाम क्षेत्रातील महिला कामगारांना सुमारे ५०० ओळखपत्रांचे (आयडी कार्ड) वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उपस्थित महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि 'फार्मर आयडी' नोंदणीची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यापूर्वी दिवाळीच्या सणात संपूर्ण जिल्हा परिषद गटात साडी व फराळ वाटप करण्यात आले होते, अशी माहिती अश्विनी खापरे यांनी दिली.
या कार्यक्रमाला भाजपचे माजी तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव, ममधुकर (आप्पा) घुडे, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई ठाकरे, संजय खापरे, हरीश हंडोरे, शरद पडवळ, बुधाजी बंगाल, चेतन खुडे, पत्रकार दत्ता हरड, अलक दिनकर, जयवंत हरड, विजय घुडे, सुभाष हरड आणि एकनाथ व्यापरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन एच. के. ग्रुपचे सदस्य चंदू हरड, सतीश शेळके व मोहन पडवळ यांच्या मित्रमंडळाने केले. शिवदास मढवी व करुणाताई गगे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्याला मुरबाड परिसरातील महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App