🔥 ट्रेंडिंग “प्रिंका चौधरी ने 20+ बेटियों को सिखाए... कलेक्टर श्री पार्थ जायसवाल ने जनपद पंच... પાંચોટિયા ગામમાં બંધ મકાનમાંથી ૩.૨૬ લા... বিজেপি নেতা কৌস্তভ বাগচীর ব্যারাকপুরের... गरुण सेना परिवार में रिंकू पाठक को शाह... जिला प्रभारी डॉ. सत्येन्द्र सिन्हा ने...
30 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्वास्थ्य

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी: रुग्णांना दिलासा; 'या' आवश्यक कागदपत्रांसह करा ऑनलाईन अर्ज.

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 30 अक्टू. 2026, 03:14 PM 👁 23
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी: रुग्णांना दिलासा; 'या' आवश्यक कागदपत्रांसह करा ऑनलाईन अर्ज
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड.
दिनांक ३०/१०/२०२६.
मुंबई (नीड २४ न्यूज):
गोरगरीब आणि गरजू रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदत देणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा (CMRF) लाभ घेणे आता अधिक सुलभ झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली असून, अर्जाची सद्यस्थिती ऑनलाईन तपासण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांकडे खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे:
• आधार कार्ड आणि रेशन कार्ड.
• उत्पन्न दाखला: वार्षिक उत्पन्न ₹१,६०,००० (१ लाख ६० हजार) पर्यंत असणे आवश्यक.
• फोटो: रुग्ण व अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो आणि रुग्णाचा जिओ-टॅग (Geo-Tag) असलेला फोटो.
• उपचार खर्चाचा अंदाज: संबंधित रुग्णालयाच्या अधिकृत लेटरहेडवर उपचार खर्चाचे एस्टिमेट.
• वैद्यकीय अहवाल: आजाराशी संबंधित सर्व वैद्यकीय व तपासणी अहवाल.
• अपघाताच्या बाबतीत: अपघात झाला असल्यास एफआयआर (FIR) ची प्रत किंवा पोलीस डायरी आवश्यक. (एमएलसी - MLC अहवाल स्वीकारला जाणार नाही).
• अंग प्रत्यारोपण: अवयव प्रत्यारोपणासाठी (Organ Transplant) मॅचिंग रिपोर्ट आवश्यक.
ऑनलाईन सुविधा उपलब्ध:
नागरिकांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती (Status) घरबसल्या जाणून घेता यावी यासाठी शासनाने ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक cmrf.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्जाचा पाठपुरावा करू शकतात. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
📲Get App