🔥 TRENDING नगर पालिका बाड़ी की पहली बैठक સ્વચ્છતા હી સેવા અભિયાન અંતર્ગત બોરીદ્... Tamil Nadu CM Announces ₹50 Lakh Rewar... All-Woman SIT Takes Over POCSO Probe i... Nitin Gadkari inaugurates Mukhyamantri... MP High Court Issues Non‑Bailable Warr...
25 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

लालबागच्या राजाच्या चरणी ५ कोटी २५ लाखांचे दान, दर्शनाचा आज शेवटचा दिवस

✍️ Reporter: Hariom Borse 🗓 25 Sep 2026, 04:16 PM 👁 11
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दानपेटीत गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत तब्बल ५ कोटी २५ लाख ७० हजार रुपयांची रोकड जमा झाली आहे. आज दर्शनाचा शेवटचा दिवस असून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

मुंबईच्या लाडक्या लालबागच्या राजाच्या दर्शनाचा आज शेवटचा दिवस आहे. दहा दिवसांच्या गणेशोत्सवात देश-विदेशातून आलेल्या भाविकांनी बाप्पाच्या चरणी भरभरून दान अर्पण केले. या दहा दिवसांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत तब्बल ५ कोटी २५ लाख ७० हजार रुपयांची रोकड जमा झाली आहे, जी गणेशभक्तांची अढळ श्रद्धा दर्शवते.

गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी, २४ सप्टेंबर रोजी भाविकांनी ५० लाख ३० हजार रुपयांचे रोख दान अर्पण केले. यापैकी मुख्य स्टेजवरील दानपेटीत ३४ लाख रुपये, तर रंगपेटीत १६ लाख ३० हजार रुपये जमा झाले. रोख रकमेसोबतच भाविकांनी सोने-चांदीचेही दान अर्पण केले. दहाव्या दिवशी ८८.६०० ग्रॅम सोने आणि ४ किलो ४९३ ग्रॅम चांदी बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आली.

गेले दहा दिवस बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेकांनी नवसपूर्तीसाठी तर अनेकांनी आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी राजाच्या चरणी लीन होऊन प्रार्थना केली. आता बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ आली असून, भाविकांच्या मनात दर्शनाचा आनंद आणि निरोपाची हुरहूर अशा संमिश्र भावना आहेत.
📲Get App