🔥 TRENDING Ronaldo's Legacy: Portugal Wins Three... PM Modi wishes prosperity on Dhanteras... NHRC Flags Human Rights Violation Over... India Targets 2030 Goal to Remove 129... Defamation Case Filed Against Preacher... India Must End Sewer Cleaning Deaths:...
06 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कल्याण पश्चिमेत इंदिरा नगर येथे नाल्याचे पाणी घरात शिरल्याने रोगराईची भीती; केडीएमसीच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप

कल्याण पश्चिमेत इंदिरा नगर येथे नाल्याचे पाणी घरात शिरल्याने रोगराईची भीती; केडीएमसीच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 21 Sep 2026, 11:14 PM 👁 84
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
कल्याण पश्चिमेत इंदिरा नगर येथे नाल्याचे पाणी घरात शिरल्याने रोगराईची भीती; केडीएमसीच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापकल्याण:कल्याण पश्चिमेकडील इंदिरा नगर परिसरात रस्त्याच्या कामासाठी टाकलेल्या भरावामुळे मुख्य नाल्याचा प्रवाह पूर्णपणे अडवला गेला आहे. यामुळे नाल्याचे दूषित व मैलायुक्त पाणी थेट स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या साचलेल्या दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असून, स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या समस्येबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना किंवा नालेसफाईची कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यात दरवर्षी अशा त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने रहिवाशांचे जगणे असह्य झाले आहे.सध्या येथील घरात पाणी साचल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. महापालिकेने संबंधित विभागामार्फत युद्धपातळीवर दखल घेऊन अडकलेला पाण्याचा प्रवाह मोकळा करावा, तात्काळ नालेसफाई करावी आणि पाण्याचा निचरा करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष न दिल्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.स्थानिक रहिवाशांची प्रतिक्रिया:"आम्ही कर भरूनही महापालिका प्रशासन आमच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. नाल्याचे घाण पाणी घरात शिरल्याने लहान मुले आणि वृद्ध आजारी पडत आहेत. वारंवार तक्रार करूनही अधिकारी ढिम्म आहेत. जर तातडीने नालेसफाई करून पाण्याचा निचरा केला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू."— स्थानिक रहिवासी, इंदिरा नगर (कल्याण पश्चिम)Need 24News साठीकाशिनाथ देसले (ठाणे जिल्हा प्रतिनिधी)किशोर पवार (मुरबाड तालुका प्रतिनिधी).
📲Get App