🔥 TRENDING அழகப்பா அரசு கலைக் கல்லூரியில் வணிகவிய... रांची में प्रदेश भाजपा कार्यालय में सा... Assam Government Announces Rs 5 Lakh A... Assam designates two parking zones for... Punjab Government Uncovers Rs 425 Cror... Devotees swarm Muzaffarpur temples for...
15 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

कोंढवा येथील मर्कजी बैतूलमाल फाऊंडेशन च्या वतीने भोर तालुक्यातील कारी येथील विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप.

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 15 Oct 2026, 11:22 AM 👁 12
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच शाळेत ये-जा करण्यासाठी लागणारा वेळ व श्रम कमी व्हावेत, या सामाजिक उद्देशाने पुणे शहरातील कोंढवा परिसरातील कौसरबाग मस्जिदद्वारे चालविण्यात येणाऱ्या मर्कजी बैतूलमाल फाऊंडेशन, कौसरबाग, पुणे यांच्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत कौसरबाग परिसरातील सोसायट्या व घरांच्या पार्किंगमध्ये दीर्घकाळापासून विनावापर पडून असलेल्या सायकली जमा करण्यात आल्या. त्यानंतर या सायकलींची दुरुस्ती व सर्व्हिसिंग करून त्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कारी गावातील कान्होजी जेधे विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत वितरित करण्यात आल्या. हे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी दररोज सुमारे ३ ते ५ किलोमीटर अंतर पायी चालत येतात. या सायकलींमुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सोयीचा होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला कारी गावचे सरपंच श्री. सतीश ढेबे, उपसरपंच श्री. माऊली तावरे, सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज श्री. रणधीर जेधे, पोलीस पाटील, तोसीफभाई आतार नगरसेवक भोर नगरपरिषद प्राचार्य आटोळे सर व सर्व शिक्षक वृंद तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मर्कजी बैतूलमाल फाऊंडेशनचे विश्वस्त हाजी फिरदौस शेख, अश्फाक संजोफी, वसीम बागवान आणि एजाज शेख उपस्थित होते. तसेच या उपक्रमासाठी मुश्ताक शेख सर, भोर तालुका मंडळ अधिकारी श्री. मुजीब शेखसाहेब, श्री लतिफभाई शेख यांनीही आवर्जून उपस्थिती लावली.

‘जुन्या वस्तूंचा पुनर्वापर आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, लोकसहभाग आणि शैक्षणिक मदतीचा आदर्श निर्माण करणारा आहे. समाजातील नागरिकांनी वापरात नसलेल्या वस्तू गरजूंपर्यंत पोहोचविल्यास अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवासात सकारात्मक बदल घडवून आणता येऊ शकतो, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
📲Get App