धर्म
झुंजार मित्र मंडळातर्फे भोरमध्ये दसऱ्यानिमित्त भव्य रावण दहन सोहळा उत्साहात संपन्न
भोर, मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०२६ : रोजी झुंजार मित्र मंडळ, वेताळ पेठ, भोर यांच्या वतीने विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भव्य दिव्य रावण दहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आकर्षक रावण प्रतिकृतीचे दहन आणि प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणाने दुमदुमून गेला.
मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. याच परंपरेला पुढे नेत यंदाही दसऱ्यानिमित्त रावण दहन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विजयादशमीचा सण उत्साहात साजरा करण्यासोबतच सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईट प्रवृत्तींवर विजय हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, महिला, युवक तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झुंजार मित्र मंडळाच्या विजयादशमी रावण दहन,उत्सव समितीचे अध्यक्ष ,श्री सुनील थोपटे सर व उपाध्यक्ष विनय पलंगे सर, व झुंजार मित्र मंडळाचे अध्यक्ष ,मयूर भिसे उपाध्यक्ष धवल पलंगे खजिनदार उमेश धारणे कार्याध्यक्ष मयूर बोडके,व गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष विशाल गुळूमकर ,पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.
भोर शहरातील सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा रावण दहन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.