जामनेर तहसील पुन्हा ACB च्या रडारवर; २५ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यक जाळ्यात, खासगी व्यक्तीसह अटक...!!!
विभागीय प्रतिनिधी
जामनेर:- शेतात जाण्या-येण्यासाठी नवीन रस्ता मंजूर करण्याच्या मोबदल्यात २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जामनेर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रविण सुपडू गांगुर्डे आणि त्यांचा खासगी दलाल योगेश रामलाल वखरे (व्यवसाय - वकील) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB), जळगावने आज दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईने पुन्हा एकदा जामनेर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमके प्रकरण काय?
ACB च्या अधिकृत अहवालानुसार, तक्रारदाराची जामनेर शिवारात गट क्रमांक ४०७ मध्ये शेतजमीन आहे. शेतात ये-जा करण्यासाठी नवीन रस्ता मिळावा यासाठी त्यांनी सन २०२२ मध्ये तहसील कार्यालयात वहिवाटीचा दावा दाखल केला होता. या दाव्यावर तहसीलदारांसमोर वेळोवेळी सुनावणी झाली असून, प्रकरण अंतिम निकालासाठी प्रलंबित होते.
तक्रारदार व त्यांचे भाऊ तहसील कार्यालयात गेले असता, आरोपी महसूल सहाय्यक प्रविण गांगुर्डे यांनी तक्रारदाराच्या बाजूने निकाल लावण्यासाठी सुरुवातीला ३० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर २५ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने जळगाव येथील ACB कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती.
पंचांसमक्ष पडताळणी आणि २५ हजारांचा सापळा
तक्रारीनंतर २१ सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी खासगी व्यक्ती योगेश वखरे यांनी महसूल सहाय्यक प्रविण गांगुर्डे यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे ACB च्या नोंदीत नमूद आहे.
त्यानंतर जामनेर तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला. ACB च्या माहितीनुसार, पंचांसमक्ष २५ हजार रुपयांची लाचेची रक्कम योगेश वखरे यांनी स्वीकारली आणि त्यानंतर ती प्रविण गांगुर्डे यांच्याकडे दिली. गांगुर्डे यांनी सदर रक्कम स्वीकारून स्वतःच्या पॅन्टच्या पुढील उजव्या खिशात ठेवल्याचे नोंदविण्यात आले असून, संपूर्ण लाचेची रक्कम ACB ने जप्त केली आहे.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम ७, ७-अ आणि १२ अन्वये जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ACB च्या अहवालात नमूद आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
पुन्हा तहसील कार्यालयच चर्चेत!
जामनेरमध्ये मागील काही काळात शासकीय कार्यालयांशी संबंधित लाचखोरी आणि गैरव्यवहाराची विविध प्रकरणे समोर आली आहेत. पंचायत समितीतील ACB कारवाई, भूमिअभिलेख कार्यालयातील कारवाई आणि तहसील कार्यालयाशी संबंधित महसूल गैरव्यवहाराचे प्रकरण यानंतर आता तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकच २५ हजारांच्या लाच प्रकरणात ACB च्या सापळ्यात सापडल्याने प्रशासनासमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
प्रश्न केवळ आज पकडलेल्या दोन व्यक्तींपुरता मर्यादित नाही. प्रश्न आहे - शासकीय कार्यालयात लाच मागण्याची वेळच का येते? नागरिकाचे वैध काम करण्यासाठी पैशांची मागणी कोणत्या व्यवस्थेतून निर्माण होते? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे प्रकार का थांबत नाहीत?
प्रशासनाने केवळ गुन्हा दाखल करून थांबू नये!
आजची कारवाई ही केवळ एका लाच प्रकरणाची घटना म्हणून न पाहता, संबंधित कार्यालयातील कामकाजाची सखोल प्रशासकीय तपासणी करण्याची संधी म्हणून पाहण्याची गरज आहे.
संबंधित महसूल सहाय्यकाने मागील काही वर्षांत हाताळलेल्या प्रकरणांची तपासणी झाली पाहिजे का? त्याच्याकडे आलेल्या फेरफार, रस्ते, महसूल आणि इतर प्रकरणांचा आढावा घेतला जाणार का? नागरिकांच्या तक्रारींची नोंद तपासली जाणार का? आणि अशा संवेदनशील कामांवर वरिष्ठ पातळीवर नियमित देखरेख होती का? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाने जनतेसमोर देण्याची गरज आहे.
कारण ACB चा सापळा हा फक्त एका कर्मचाऱ्याला पकडण्यापुरता नसतो, तो प्रशासनातील त्रुटी शोधण्यासाठीही इशारा असतो. आजचा सापळा जामनेर तहसील कार्यालयासाठी पुन्हा एकदा गंभीर इशारा ठरला आहे. लाच घेणारा पकडला गेला; पण लाचखोरीची व्यवस्था थांबणार कधी? हा प्रश्न आता जामनेरच्या जनतेचा आहे.
📌 ACB चे नागरिकांना आवाहन
कोणताही लोकसेवक लाच मागत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी.
ACB जळगाव: 0257-2235477 / 7588661064