🔥 ट्रेंडिंग सेंधवा विधानसभा क्षेत्र में दिग्गज अभि... 21 वर्षीय युवती की हत्या के आरोपी को ग... केरल: आत्महत्या की कोशिश से 7 गाड़ियों... चंडीगढ़ के गोल्फ कोर्स रोड अंडरपास में... इंदापूर‑बारामतीमध्ये भयंकर पावस लीयरजेट क्रैश में टेक टाइकून, पत्नी और...
03 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात लाचखोरी उघड; एसीबीच्या सापळ्यात दोन अभियंते अडकले....!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 03 नव. 2026, 08:14 AM 👁 12
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

१० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; अंगझडतीत १ लाख १२ हजारांपेक्षा जास्त रोकड सापडली

जळगाव : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात बिल मंजूर करण्यासाठी लाच मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (२ नोव्हेंबर) सापळा रचून उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंत्याला ताब्यात घेतले.

या कारवाईत उपविभागीय अधिकारी सतीश मनसुलाल शिसोदे (वय ५५) आणि कनिष्ठ अभियंता भागवत वसंता चवरे (वय ३२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ही लाच मागितली जात होती.

तक्रारदार हे सबकॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांनी २०२५-२६ या वर्षात पिंप्री खुर्द येथे सुमारे १० लाख रुपयांचे रस्त्याचे काम केले होते. मोजणी पुस्तिका तयार करण्यासाठी यापूर्वीच २० हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर बिलावर सही करून ते पुढे पाठवण्यासाठी पुन्हा १५ हजार रुपयांची मागणी होत होती, अशी तक्रार त्यांनी एसीबीकडे केली होती.

तक्रारीनंतर एसीबीने तक्रारदाराला व्हॉईस रेकॉर्डर दिला. त्यावरून झालेल्या संवादाची पडताळणी करण्यात आली. त्यात सुरुवातीला १५ हजार रुपयांची मागणी झाल्याचे आणि नंतर १० हजार रुपयांवर तडजोड झाल्याचे स्पष्ट झाले. या आधारावर एसीबीने सापळा रचला.

ठरल्याप्रमाणे १० हजार रुपये स्वीकारताना कनिष्ठ अभियंता चवरे यांना पकडण्यात आले. ही रक्कम त्यांनी उपविभागीय अधिकारी शिसोदे यांच्यासाठी घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

विशेष म्हणजे, ही कारवाई जळगावातील एसीबी कार्यालयाच्या शेजारीच असलेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागीय कार्यालयातच झाली. मात्र, ही कारवाई नंदुरबार एसीबीच्या पथकाने केली. पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक आले होते.

अंगझडतीत शिसोदे यांच्याकडे ९१ हजार ६२० रुपये, तर चवरे यांच्याकडे २० हजार ६०० रुपये अशी एकूण १ लाख १२ हजार २२० रुपयांची रोकड मिळाली. दोघांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. दोघांचे मासिक वेतन जवळपास ७५ हजार रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे.

दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत दोघांच्या घरांची तपासणी सुरू होती. पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
📲Get App