🔥 TRENDING TIPRA Motha Demands Probe into Alleged... Himachal Pradesh to Add 1,000 Electric... Six-State Kishau Pact Boosts CM Sukhu’... Himachal Pradesh Allocates PWD and Urb... Madhya Pradesh CM Criticizes Rahul Gan... धनरूआ में मोईधर पुल के पास ट्रेन की चप...
19 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

गौताळा अभयारण्य परिसरात खळबळ; वनमजुराच्या घरातच आढळले जिवंत काळवीट..!!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 19 Sep 2026, 09:08 PM 👁 9
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विक्रीसाठी Schedule-I मधील संरक्षित नर काळवीट डांबून ठेवल्याचा संशय, वनविभागाच्या विशेष पथकाची कारवाई

विभागीय प्रतिनिधी


चाळीसगाव - गौताळा अभयारण्य परिसरात वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वनविभागाच्या विशेष भरारी पथकाने १८ सप्टेंबर रोजी केलेल्या कारवाईत एका शेतातील घरातून जिवंत नर काळवीटाची सुटका करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घर हे वनविभागातच वनमजूर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचे आहे. अंदाजे दोन वर्षे वयाचे हे काळवीट त्या घरात बांधून ठेवण्यात आले होते. वन्यप्राण्याची विक्री करण्याच्या उद्देशाने त्याला डांबून ठेवल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

संशयितावर वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा

या प्रकरणात शिवापूर येथील रहिवासी सुभाष शिवाजी कुन्हाडे (वनमजूर) याचे नाव संशयित म्हणून पुढे आले आहे. वनविभागाने त्याच्याविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ९, ३९(३अ), ३९(ब), ४०(२) आणि ५१ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. काळवीट हा Schedule-I मधील अतिसंरक्षित प्राणी आहे.

वरिष्ठ कर्मचाऱ्याची भूमिकाही संशयास्पद?

हा प्रकार केवळ वनमजुरापुरता मर्यादित नसून, त्याच्या वरिष्ठ असलेल्या वनविभागातील एका कर्मचाऱ्याचाही यात सहभाग असण्याची शक्यता Crime & Corruption Control Association (CCCA) ने वर्तवली आहे. मात्र हा तपासाचा भाग असून पुराव्याअंतीच सत्य समोर येईल, असेही CCCA ने स्पष्ट केले आहे.

१५ दिवसांत तिसरी गंभीर घटना

गौताळा अभयारण्य परिसरात गेल्या पंधरा दिवसांतील ही तिसरी गंभीर घटना आहे. यापूर्वी अंजन वृक्षांची अवैध कत्तल आणि चंदन तस्करीचे प्रकार उघडकीस आले होते. आता प्रत्यक्ष वनकर्मचाऱ्याच्या घरातच संरक्षित प्राणी आढळल्याने स्थानिक वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

CCCA ने दिलेल्या माहितीनुसार चाळीसगाव परिसरातून वन्यजीव तस्करीसाठी प्रामुख्याने तीन मार्ग वापरले जातात :
चाळीसगाव - धुळे - नवापूर - गुजरात ; चाळीसगाव - मालेगाव - मुंबई ;
चाळीसगाव - छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर - मुंबई

"या प्रकरणामागील संपूर्ण साखळी उघड करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी." - Crime & Corruption Control Association (CCCA)
📲Get App