🔥 ट्रेंडिंग फतेहपुर: नवरात्र में मां भवानी मंदिर क... आमलिया ग्राम पंचायत: वार्ड 4 से सोनारा... वाराणसी में 11 से 26 अक्टूबर तक बंद रह... IMF અને વિશ્વ બેંકના અહેવાલો: ભારત ૨૦૨... मिज़ोरम में 10 करोड़ रुपये की ड्रग्स व... गोवा और मिज़ोरम ने युवा प्रतिनिधिमंडल...
11 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मनोरंजन

डॉ. गणेश चंदनशिवे यांची जीवनगौरव पुरस्कार समितीवर निवड; रामदास राऊत यांच्याकडून अभिनंदन

✍️ रिपोर्टर: Anil Mallav 🗓 10 अक्टू. 2026, 11:34 PM 👁 23
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार समिती’च्या अशासकीय सदस्यपदी

डॉ. गणेश चंदनशिवे यांची जीवनगौरव पुरस्कार समितीवर निवड; रामदास राऊत यांच्याकडून अभिनंदन

पुणे जिल्हा रिपोर्टर | ११ ऑक्टोबर २०२६

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार समिती’च्या अशासकीय सदस्यपदी लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गणेश जी. चंदनशिवे यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल ‘तृप्ती फिल्म प्रोडक्शन’चे निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते रामदास राऊत यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बेल्हे येथील लोककला सांस्कृतिक तमाशा महोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या भेटीतून चंदनशिवे व राऊत यांच्यात वैचारिक मैत्री निर्माण झाली. चंदनशिवे यांनी राऊत यांच्या लघुचित्रपटांचे कौतुक व मार्गदर्शन केले असून, लोककलावंतांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या कार्याचेही कौतुक केले आहे.

डॉ. चंदनशिवे सरांचा मनमोकळा स्वभाव, आपुलकी आणि मार्गदर्शन नवोदित कलावंतांसाठी नेहमीच प्रेरणादायी आहे,” असे रामदास राऊत यांनी सांगितले.
📲Get App