🔥 TRENDING અકસ્માત શિક્ષણ સાથે સંસ્કારની ધૂમ, ઝાલોદમાં પા... Help Group Gujarat એ બકલપુરા, ઇડર, સાબ... विद्यालय में हुआ शिक्षक और अभिभावक का... 6202509699 Madhya Pradesh fuel stations to ban UP...
19 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

बाप्पाच्या दर्शनाला गेला अन् काळाने हिरावले; जळगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मुंबईत दुर्दैवी अंत....!!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 19 Sep 2026, 06:34 PM 👁 10
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनीधी

जळगाव, दि. १९ - मुंबई येथील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अत्यंत उत्साहाने गेलेल्या जळगाव शहरातील एका २५ वर्षीय नवयुवकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. जयदीप मेघराज नेमाडे (वय २५, रा. जीवनमोती सोसायटी, शिरसोली रोड, जळगाव) असे मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. लाडक्या बाप्पाच्या दर्शनाची ओढ घेऊन गेलेल्या तरुण मुलाचा असा अचानक मृत्यू झाल्याने नेमाडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण जळगाव शहरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जळगाव येथील रहिवासी असलेला जयदीप नेमाडे हा गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला होता. दर्शनाच्या रांगेत असतानाच त्याला अचानक प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. त्याची बिघडलेली प्रकृती पाहून तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय पथकाने त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले; मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. उपचारादरम्यान गुरुवारी, १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११:४० वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

या घटनेची बातमी जळगावात पोहोचताच नेमाडे कुटुंबावर आणि मित्र परिवारावर शोककळा पसरली. मृत जयदीप याचे पार्थिव जळगाव येथे आणल्यानंतर शनिवारी, १९ सप्टेंबर रोजी सकाळी नेरी नाका स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील नागरिक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्याच्या पश्चात वडील मेघराज सुभाष नेमाडे, मोठे काका ललित ओंकार नेमाडे, काका रवींद्र सुभाष नेमाडे, प्रमोद सुभाष नेमाडे यांच्यासह समस्त नेमाडे परिवार आहे.
📲Get App