🔥 TRENDING ભારુચમાં મુખ્ય માર્ગ પર રોડ કામ શરૂ રૂશ્વત વિરોધી બ્યુરો દ્વારા રાજ્યવ્યાપ... સાબરકાંઠા યુવા મોરચાની બૃહદ જિલ્લા બેઠ... વિક્રમ ઠાકોર, રાકેશ બારોટ, વિજય સુવાળા... સાતકુંડા ખાતે પોલીસ અને પ્રજાનો મહા સ્... Heat and water scarcity cause mixed ku...
21 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम: ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ संकल्प

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 19 Sep 2026, 06:48 PM 👁 22
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

१८ सप्टेंबर २०२६ रोजी भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी नगरपरिषद आणि इतर भागीदारांनी स्वच्छता मोहीम राबविली.

भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर १८ सप्टेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवसानिमित्त जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी नगरपरिषद, ग्रामपंचायत भाट्ये, फिनोलेक्स आणि एम.एम.बी. यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत समुद्रकिनारा स्वच्छ केला. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्लास्टिक प्रदूषण रोखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचे सांगितले आणि स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून व आपल्या घरापासून करणे आवश्यक आहे असे आवाहन केले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘एकल प्लास्टिक वापरू नका, एकच ध्यास ठेवू या प्लास्टिक पिशवी हटवू, समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करू या, वापर टाळू या प्लास्टिकचा, जागर करू या’ असा पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचे प्रकाशन व वितरण केले.

‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ या अभियानांतर्गत उपस्थितांनी समुद्र, किनारे व समुद्री परिसंस्थेचे संरक्षण करण्याची शपथ घेतली आणि कचरा न टाकणे, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणे व इतरांना स्वच्छतेसाठी प्रेरित करण्याचा संकल्प केला.

पंचायती समिती सभापती प्रविण पांचाळ, सदस्य अर्चना साळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, सागर पाटील, गटविकास अधिकारी उमेश गावखडकर, उपमुख्याधिकारी मयूर बेहरे व विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App