🔥 TRENDING Women Vendors Demand Safer, Climate‑Re... भदडीया में पूरी पंचायत निर्विरोध ग्राम... बहराइच के अलीनगर में ट्रैक्टर विवाद पर... Chief Minister Aye Urges Sumis and Yim... ಕಲಮಲಾದಲ್ಲಿ ಕೂಲಿಕಾರರ ಸಭೆ - ಅಳತೆಯ ನೆಪದಲ್... હિંમતનગરના કરણપુરમાં 35 કરોડના અર્બુદા...
15 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

भोरमध्ये भात कापणीच्या कामांना वेग

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 15 Nov 2026, 04:25 PM 👁 28
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भोर तालुक्यातील हिरडस मावळातील वाठार हिमा परिसरात भात कापणीची लगबग दिसून येत आहे. मात्र, यंदा भात पोसणीच्या काळात पावसाने दडी मारल्याने भात पीक वाया गेले. त्यामुळे यावर्षी भाताच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तालुक्यात साधारण ७५०० हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी करण्यात येते. यावर्षी पिके चांगली तरारली होती. मात्र, ऐन पोसणीच्या काळात पावसाने दडी मारली. त्यामुळे पिके वाया गेली. तसेच यातूनही उरलेल्या पिकांना पावसाने झोडपले. त्यामुळे यंदा भात शेतीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भात पीक करपून गेल्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध असणारा पेंडाही खराब झाला आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भोर तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची परिस्थिती आहे. पाण्याअभावी भात पिके करपली आहेत. तर काही पिके पोसलीच नाहीत. काही शेतकऱ्यांनी पाणी साठ्याच्या

वाठार हिमा (ता. भोर): भात कापणी करताना शेतकरी.
उपलब्धतेनुसार भाताला पाणी दिले होते. तसेच जी पाण्याची खाचरे होती त्या ठिकाणी थोडे का होईना पण पीक पदरात पडेल या आशेवर कापणीला सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी जनावरांना चारा तरी मिळेल या अपेक्षेने कापणी सुरु केली आहे. आधीच पिके वाया गेल्याने नुकसान होणार असल्याने शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह भात कापणी करत आहेत. पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याने यंदा भात उत्पादनात मोठी

दरवर्षी ३०-३५ पोती भात निघते. परंतु, यंदा पिके करपली आहेत. ओलावा असलेल्या ठिकाणी भात पोसले आहे. दहा-बारा पोती निघण्याची अपेक्षा आहे. त्यातूनही मळणी केल्यावरच उत्पादन समजेल. मात्र, यंदा उत्पादनात घट होणार आहे असे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.
📲Get App