🔥 TRENDING India's Rising Global Influence Highli... Delhi Police Officer Removed from BRIC... Inside Hammock: Indian Literary Magazi... Bihar NEET UG 2026 Round 2 Choice Fill... Ex-Army Soldier Stole 12 Weapons from... West Bengal Orders Closure of 252 Madr...
13 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Education

भाजप प्रज्ञा आघाडीच्या वतीने आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी व शैक्षणिक साहित्य वाटप.

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 12 Sep 2026, 02:32 PM 👁 61
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुरबाड तालुक्याचे कार्यसम्राट सन्माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत भाजप प्रज्ञा आघाडीच्या वतीने नेत्र तपासणी आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा स्तुत्य कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.हा कार्यक्रम भाजप प्रज्ञा आघाडीचे मुरबाड तालुकाप्रमुख लक्ष्मण घागस व मानिवली सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठल कड़व यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.ग्रामस्थांचे आणि उद्योजकांचे मोठे योगदानया प्रसंगी उपस्थित असलेले प्रसिद्ध उद्योजक विठ्ठल कड़व यांनी शाळेसाठी आवश्यक असलेली इलेक्ट्रिक फिटिंग, फॅन आणि गावच्या समाज मंदिरासाठी आपली हक्काची जागा विनामूल्य देण्याचे मोलाचे आश्वासन दिले. तसेच, लक्ष्मण घागस सर यांनी गावातील बंद पडलेली बोरवेल त्वरित सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.मान्यवरांची उपस्थितीया सामाजिक कार्यक्रमाला गावच्या माजी सरपंच हौसाबाई बांगारा, उपसरपंच पमाताई खैर, माजी पोलीस पाटील धर्मा बांगारा, गावच्या सीआरपी, आशा सेविका, अंगणवाडी मदतनीस, शिक्षिका तसेच शाळेतील सर्व शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.२४ न्यूज वृत्तवाहिनीसिटीझन रिपोर्टर: काशिनाथ देसलेतालुका रिपोर्टर: किशोर पवारदिनांक: ११ सप्टेंबर २०२६.
📲Get App