🔥 TRENDING Rahul Gandhi addresses students in Ind... 35-year-old found dead in locked room... Body mix-up at Jaipur's private Anch H... પાલિકાએ ઝેપ્ટોના ગોડાઉનમાં મળેલી એક્સપ... शेखपुरा में हुई गंभीर सड़क दुर्घटना: ब... காரைக்குடி நகரில் கனமழை.
19 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

अवैध वाळू उपशावर महसूल ची धडक

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 19 Sep 2026, 03:10 PM 👁 30
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ट्रॅक्टर जेसीबी हायवा जप्त करण्यात आले

गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उपशावर महसूलची धडक कारवाई; 29 वाहने जप्त,3कोटी ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

विलास पाटील दिनांक 18रोजी पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर महसूल विभागाने आज पहाटे धडक कारवाई केली. पहाटे पाच वाजताच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारी 29 वाहने जागीच जप्त करण्यात आली असून सुमारे 3 कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गिरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार वाळू चोरी व अवैध रेती परिवहन नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या वाहनांचा पंचनामा करण्यात आला आहे.

या धडक कारवाईत पाचोरा प्रांत अधिकारी, तहसीलदार, भडगाव परिवहन विभागाचे अधिकारी, स्थानिक महसूल पथक व पोलीस पथकाचा समावेश होता.

अवैध वाळू उपशामुळे शासनाचा महसूल बुडत असून नदीपात्राचे मोठे नुकसान होत आहे. यापुढेही अशा अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
📲Get App