Crime
निमोणे येथे समाईक विहिरीच्या पाण्यावरून ७० वर्षीय शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ
७० वर्षांच्या वृद्ध शेतकऱ्यावर असा क्रूर व जीवघेणा हल्ला झाल्याने निमोणे परिसर आणि संपूर्ण शिरूर तालुक्यातून तीव्र संताप
निमोणे येथे समाईक विहिरीच्या पाण्यावरून ७० वर्षीय शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ
निमोणे विशेष प्रतिनिधी :
शिरूर तालुक्यात आधीच पाण्याचे दुर्भिक्ष आणि दुष्काळाचे सावट असताना, पाण्याच्या वादातून एका वृद्ध शेतकऱ्यावर थेट जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना निमोणे येथील जाधव वस्तीवर घडली आहे. या घटनेत ७० वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची पार्श्वभूमी व सविस्तर वृत्त:
मिळालेल्या माहितीनुसार, निमोणे येथील रहिवासी श्री. भाऊसाहेब किसन जाधव वय ७० वर्ष, रा. जाधववस्ती, निमोणे, ता. शिरूर हे आपल्या हक्काच्या व वाटणीतील समाईक विहिरीचे पाणी शेतात सोडण्यासाठी गेले होते. त्या दिवशी त्यांच्या शेतात पाणी देण्याची पाळी होती.
पाणी सोडण्याबाबत विचारणा केली असता, धनंजय ज्ञानदेव जाधव आणि ज्ञानदेव किसन जाधव यांनी भाऊसाहेब जाधव यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली व त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला.
आज दुपारी घडला प्रकार पोलिसांची वैद्यकीय उपचारासाठी मेडीकल यादी
ही घटना आज दि. २४ ऑक्टोबर २०२६ दुपारी सुमारे १२:०० वाजण्याच्या सुमारास जाधववस्ती येथे घडली. भांडणात गंभीर मार लागल्याने भाऊसाहेब जाधव हे जखमी झाले.
घटनेनंतर शिरूर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार बकल नंबर ५८७ यांनी तातडीने दखल घेत वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय शिरूर यांच्याकडे 'मेडीकल यादी' मेडीकल सर्टिफिकेट,वैद्यकीय तपासणी पत्र सादर केली आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांचे मेडीकल सर्टिफिकेट प्राप्त करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
परिसरात तीव्र संताप:
शिरूर तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असताना, हक्काच्या आणि पाळीच्या पाण्यासाठी एका ७० वर्षांच्या वृद्ध शेतकऱ्यावर असा क्रूर व जीवघेणा हल्ला झाल्याने निमोणे परिसर आणि संपूर्ण शिरूर तालुक्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर त्वरित आणि कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.