🔥 TRENDING श्रीमाधोपुर: यूडीएच मंत्री झाबर सिंह ख... Held discussions with various Heads of... जालन्यातील प्रशांत अशोक प्रधान यांचे '... मावणों भाषा‑संस्कृति संरक्षण संगोष्ठी... करौली में जय नसीर बाबा क्रिकेट प्रतियो... मावणों भाषा‑संस्कृति संरक्षण संगोष्ठी...
06 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
National

येनापूर–जयरामपूर परिसरातील १३ गावांच्या शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहणाविरोधात तीव्र एल्गार!

✍️ Reporter: Dr. PINTU PAUL 🗓 06 Nov 2026, 04:30 PM 👁 35
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

येनापूर–जयरामपूर परिसरातील १३ गावांच्या शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहणाविरोधात तीव्र एल्गार!

तालृका आष
येनापूर–जयरामपूर परिसरातील १३ गावांच्या शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहणाविरोधात तीव्र एल्गार!
शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ – महिला शेतकऱ्यांचा निर्धार
गडचिरोली : येनापूर–जयरामपूर परिसरातील १३ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या अधिग्रहणाच्या प्रश्नावर आता शेतकरी आक्रमक झाले असून, आपल्या हक्काच्या जमिनी वाचवण्यासाठी महिला व पुरुष शेतकरी एकजुटीने रस्त्यावर उतरले आहेत.
या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी महिला भारती ताईंनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या, "गडचिरोलीमध्ये आमच्या मदतीसाठी पुढे येणारा एकही नेता नाही. आम्ही आमच्या ताकदीवर लढत आहोत. आमची जमीन आणि आमचे हक्क वाचवण्यासाठी आम्हालाच रस्त्यावर उतरावे लागत आहे."
शेतकऱ्यांचा सवाल आहे की, त्यांच्या पिढ्यान्‌पिढ्यांच्या जमिनींचा निर्णय घेताना शेतकऱ्यांना विश्वासात का घेतले जात नाही? विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा आधार हिरावून घेण्याचा प्रयत्न का केला जात आहे?
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
1. संबंधित १३ गावांतील जमीन अधिग्रहणाबाबतची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी.
2. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही सक्तीची कारवाई करू नये.
3. जमीन अधिग्रहणासंबंधी सर्व कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी.
4. शेतकऱ्यांना योग्य मोबदला, पुनर्वसन आणि कायदेशीर हक्कांची हमी द्यावी.
5. शेतकऱ्यांच्या हरकती व मागण्यांवर लेखी स्वरूपात निर्णय द्यावा.
आमचा लढा कोणत्याही विकासाच्या विरोधात नाही; मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी, हक्क आणि भविष्य उद्ध्वस्त करून होणारा विकास आम्हाला मान्य नाही.
प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांची जमीन, शेतकऱ्यांचा अधिकार!
जमीन वाचवा, शेतकरी वाचवा!
📲Get App