🔥 TRENDING ढाढ़ोली गांव में चुनावी माहौल RBI Launches New Forex Window to Meet... Kerala Lottery 10 Oct 2026: Karunya KR... Former Kerala CM Pinarayi Vijayan Deta... Crowds swell at Hyderabad bus and rail... 1.812 million voters may be omitted fr...
10 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Education

विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जिल्हास्तरीय संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 10 Oct 2026, 12:14 PM 👁 28
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भोर, पुणे : विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स्कूल, भोर येथे पूजनीय दादासाहेब एकबोटे जिल्हास्तरीय संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते ११.०० या वेळेत ही स्पर्धा पार पडली. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची सहा गटांमध्ये विभागणी करून संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स्कूल, जिजामाता, रथखाना तसेच प्राथमिक शाळा अंबाडे या शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स्कूलमधील तब्बल ९५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. सतीश लिंबकर, सौ. रूपाली जोशी, सौ. भाग्यश्री महाशब्द पाटील आणि सौ. भक्ती कापरे यांनी काम पाहिले. संस्कृत श्लोकांच्या पाठांतरामुळे विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती, एकाग्रता, शुद्ध उच्चार व आत्मविश्वासाचा विकास होण्यास मदत झाली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेविषयी आवड निर्माण होऊन भारतीय संस्कृती आणि संस्कृत भाषेच्या समृद्ध परंपरेची ओळख झाली. कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी संतोष मादगुडे यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. विभागप्रमुख श्री. निवृत्ती खोपडे, सहकारी शिक्षक श्री. दत्तात्रय महांगरे, तसेच सर्व वर्गशिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
📲Get App