🔥 TRENDING साबला ब्लॉक में बीएपी प्रत्याशी देवीला... भोर तालुक्यात दोन अल्पवयीन चुलत भावांक... Congress Punjab chief Pargat Singh say... Woman Killed, Husband Injured in Truck... Husband Assaults Wife in Public Over D... Amritsar Authorities Monitor Voting Ce...
24 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स्कूल, भोर येथे दिवाळीनिमित्त आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न!

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 24 Oct 2026, 07:39 PM 👁 39
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भोर : विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स्कूल, भोर येथे दिवाळी सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आकाशकंदील बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलात्मकता, कल्पकता आणि हस्तकौशल्य विकसित करणे हा होता. विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे कागद, आकर्षक सजावटीचे साहित्य आणि उपलब्ध वस्तूंचा वापर करून सुंदर व मनमोहक आकाशकंदील तयार केले. आपल्या कल्पकतेतून विविध आकारांचे आणि रंगांचे आकाशकंदील साकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या हातांनी कलाकृती तयार करण्याचा आनंद, टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर, वस्तूंची योग्य मांडणी तसेच पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे महत्त्व समजले. अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळते आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला नवी दिशा मिळते.
या कार्यशाळेसाठी कलाशिक्षक दत्तात्रय महांगरे सर यांनी विद्यार्थ्यांना आकाशकंदील बनविण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध कलात्मक संकल्पना समजावून सांगत आकर्षक आकाशकंदील तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी मादगुडे मॅडम यांनी या उपक्रमाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच क्रीडा शिक्षक श्री. संतोष मादगुडे सर संगीत शिक्षक श्री. निवृत्ती खोपडे सर आणि विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी मोलाचे सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला प्रोत्साहन देणारा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद, सहकार्याची भावना आणि सर्जनशीलतेची जाणीव निर्माण झाली.
अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा विद्यालयाचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
📲Get App