🔥 TRENDING पाली में 10 अक्टूबर से पेट्रोल पंपों प... શેત્રુંજી વન્યપ્રાણી વિભાગ દ્વારા ભંડા... आगरा: लिव-इन रिलेशनशिप में रह रही छात्... ग्राम गड़रपुर को राजस्व ग्राम बनाने की... चन्द्रहिया में कार दुर्घटना: दो लोग घा... Meghalaya High Court issues contempt n...
09 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

वॉटर पार्कजवळ तरुणाचा रहस्यमय मृत्यू, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी; लूट की पूर्ववैमनस्य? पोलिसांसमोर तपासाचे आव्हान....!!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 09 Oct 2026, 10:20 AM 👁 18
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

भुसावळ : शहरातील वरणगाव मार्गावरील प्रसिद्ध वॉटर पार्कच्या परिसरात आज गुरुवारी सकाळच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.

प्राथमिक पाहणीत मृताच्या डोक्याच्या पाठीमागील भागावर गंभीर जखम आढळून आली आहे. यामुळे हा अपघाती मृत्यू नसून घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेच्या गंभीरतेचा अंदाज घेऊन बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून पंचनामा करण्यात आला. पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून फॉरेन्सिक टीमला तात्काळ बोलावण्यात आले असून, तज्ज्ञांकडून घटनास्थळावरील प्रत्येक धागेदोरा तपासला जात आहे.

एखाद्या जड वस्तूने डोक्यात प्रहार करून तरुणाचा खून करण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल हाती आल्याशिवाय मृत्यूचे खरे कारण सांगणे कठीण असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हा गुन्हा लुटीच्या उद्देशातून झाला आहे का, जुन्या वादातून हत्या झाली आहे का, की यामागे आणखी काही वेगळे कारण आहे, या सर्व अंगाने पोलीस तपास करीत आहेत. यासाठी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेऊन त्याची पडताळणी सुरू आहे.

दरम्यान, मृत तरुणाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटवण्यासाठी पोलीस स्थानिक नागरिकांची मदत घेत असून माहिती संकलित करत आहेत.

मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे. या अहवालानंतरच मृत्यूचे गूढ उकलणार असून तपासाला योग्य दिशा मिळणार आहे.
📲Get App