🔥 TRENDING માંડલીખુટામાં તેજા દશમી નિમિત્તે ભવ્ય... અમરેલીમાં સાંસદ અને રાજ્ય મંત્રી સાથે... मध्य प्रदेश के शहडोल जिले में सोमवार क... NPCIL starts fuel loading for 700 MW U... शहडोल में फूटा रसोइया और स्व-सहायता सम... Tamil Nadu Races to Capture TV, Digita...
21 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
विशेष वृत्तशहापूर-मुरबाडमधील विनाशकारी प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार;
Agriculture

विशेष वृत्तशहापूर-मुरबाडमधील विनाशकारी प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार;

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 08 Sep 2026, 01:02 PM 👁 51
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
२४ न्यूज (24 News) विशेष वृत्तशहापूर-मुरबाडमधील विनाशकारी प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; गोरक्षनाथ मठात 'घोंगडी बैठकी'द्वारे आंदोलनाचा निर्धार!डोळखांब: "सरकार कोणतेही असो, त्यांची धोरणे ही जागतिक बँकेच्या इशाऱ्यावर आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या फायद्यासाठीच ठरवली जातात," असा घणाघाती आरोप करत शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील प्रस्तावित विनाशकारी प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांनी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. डोळखांब येथील ऐतिहासिक गोरक्षनाथ मठात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.शहापूर-मुरबाड तालुक्यातील शाई आणि काळू धरण, तसेच जुन्नर-मुरबाड सीमावर्ती भागातील १५०० मेगावॉटचा प्रस्तावित भोरांडे वीज प्रकल्प यांमुळे स्थानिक शेतकरी मोठ्या प्रमाणावर भूमिहीन होण्याची भीती निर्माण झाली आहे. या रोजगारविरहित आणि विनाशकारी धोरणांमुळे सामान्य नागरिकांचे जगणे असह्य होणार असल्याचे सांगत, 'शाई धरणविरोधी शेतकरी संघर्ष समिती'चे संघटक प्रशांत सरखोत आणि महाराष्ट्र जन आंदोलन मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या विकास धोरणांवर तीव्र कडाडून टीका केली.न्यायालयाऐवजी रस्त्यावरील लढाई!या बैठकीत उपस्थित ग्रामस्थांनी आणि शेतकरी संघटनांनी एकमुखाने ठरवले की, आता केवळ न्यायालयीन लढाईवर अवलंबून न राहता लोकशाही मार्गाने थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल. जनतेच्या आवाजाची दखल सरकारला घ्यावीच लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.गावोगावी जनजागृतीचा विडा:आंदोलन अधिक मजबूत करण्यासाठी पुढील रणनीती आखण्यात आली आहे:घोंगडी बैठका: गावोगावी जाऊन 'घोंगडी बैठका' घेतल्या जातील आणि प्रकल्पांचे दुष्परिणाम सांगून व्यापक जनजागृती केली जाईल.महाराष्ट्रभर मेळावे: लढा अधिक व्यापक करण्यासाठी केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी मेळावे आयोजित करून संघटना बळकट केली जाईल.दरम्यान, पश्चिम वाहिनी नद्यांमधील (वैतरणा व उल्हास उपखोरे) समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याबाबत आणि भूगर्भ अन्वेषणाच्या कामांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शाश्वत शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी हा लढा शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार यावेळी सर्व उपस्थितांनी केला.रिपोर्ट:किशोर पवार, तालुका प्रतिनिधी, मुरबाडकाशिनाथ देसले, जिल्हा प्रतिनिधी, ठाणे२४ न्यूज (24 News)दिनांक: ०८/०९/२०२६
📲Get App