🔥 ट्रेंडिंग भोपाल स्टेशन पर वीडियो: दिवाली-छठ के द... फरीदाबाद में पार्किंग विवाद से हुई गोल... रोहित शर्मा ने नया इतिहास रचा, शाहिद आ... पंजाब ने हरियाणा पर धुंधली धुएँ की जिम... सुस्मिता मुखर्जी ने रामायण की प्रशंसा... शंकर ने यश के रावण को 'प्यारा खलनायक'...
08 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

वरोरा येथे ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी व विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!

✍️ रिपोर्टर: DOCTOR PINTU PAUL 🗓 08 नव. 2026, 09:32 AM 👁 13
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

वरोरा येथे ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी व विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!

वरोरा येथे ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी व विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत ग्रामपंचायत अधिकारी आणि पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे वरोरा तालुक्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ३७ वर्षीय तक्रारदाराला आपल्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतजमिनीवर बार अँड रेस्टॉरंटचे बांधकाम करायचे होते. त्यासाठी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवणे आवश्यक होते. हे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग निळकंठ पेंदे (वय ४८) आणि पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रणव सुधाकर बक्षी (वय ५१) यांनी स्वतःसाठी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने सुरुवातीला ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २ नोव्हेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने ४ व ५ नोव्हेंबर रोजी लाचेच्या मागणीची शहानिशा केली. त्यानंतर तडजोडीअंती ३ लाख रुपये स्वीकारण्याचे ठरल्याचे तपासात निष्पन्न झाले.
गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने पूर्वनियोजित सापळा रचला. मौजा खांबाळा येथे पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ३ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग पेंदे आणि विस्तार अधिकारी प्रणव बक्षी या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर एसीबीच्या पथकाने केली.
लाचखोरीविरोधात एसीबीचा कडक इशारा!
शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चंद्रपूर कार्यालयाशी किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.
टीप : संबंधित व्यक्तींवरील आरोपांचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत होईल.
संकलन व प्रसारण : डॉ. पी. डी. पाल
न्यूज २४ | चंद्रपूर
📲Get App