🔥 TRENDING Supreme Court permits one-time Karthig... Canada designates gangster Goldy Brar... મોરબીમાં ડમ્પર હિટ-એન્ડ-રનથી પિતા-પુત્... करौली में अंजनी मां के वार्षिक देवउठनी... Low Pressure Over Bay of Bengal May Tr... MP Sanjay Raut Calls for Nagpur to Be...
21 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Defence

वीर जवान करण चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच प्रार्थना....

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 21 Nov 2026, 07:46 AM 👁 20
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

करण चौधरी भारतीय लष्करात कार्यरत होते जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे कर्तव्यावर असताना त्यांना गोळी लागली आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाला मिळालेल्या वृत्तानुसार कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब परिसरात देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना ही घटना घडली या घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि दहशतवादी हल्ल्याशी असलेला संबंध याबाबत अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे पण एक गोष्ट नक्की आहे करण देशासाठी कर्तव्य बजावत असतानाच गेले

ज्या घरातून २४ नोव्हेंबरला लग्नाची वरात निघणार होती त्याच घरात आता जवानाच्या पार्थिवाची वाट पाहिली जात आहे हेच वाक्य जवानाच्या त्यागाचं संपूर्ण अर्थ सांगून जातं

करण चौधरी भारतीय लष्करात कार्यरत होते जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे कर्तव्यावर असताना त्यांना गोळी लागली आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाला मिळालेल्या वृत्तानुसार कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब परिसरात देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना ही घटना घडली या घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि दहशतवादी हल्ल्याशी असलेला संबंध याबाबत अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे पण एक गोष्ट नक्की आहे करण देशासाठी कर्तव्य बजावत असतानाच गेले

विशेष म्हणजे २४ नोव्हेंबर रोजी त्यांचे लग्न ठरले होते घरात लग्नाची तयारी सुरू होती नातेवाईकांना निमंत्रणपत्रिका दिल्या जात होत्या कुटुंबीय आनंदाने त्यांच्या घरी येण्याची वाट पाहत होते घरात Kupwadहळदीचे गाणे वाजणार होते मांडव सजणार होता आईच्या हातात मेहंदीचा कोन होता वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद होता

करण १७ नोव्हेंबर रोजी सुट्टीवर घरी येणार होते त्यांनी आईला सांगितलं होतं आई मी येतोय लग्नाची सगळी तयारी करूया पण त्याआधीच त्यांच्या निधनाची दुःखद बातमी कुटुंबीयांपर्यंत पोहोचली ज्या फोनची वाट घर बघत होतं तो फोन आलाच पण तो फोन आनंदाचा नव्हता तो फोन काळीज चिरणारा होता

हाच तर जवानाचा त्याग आहे आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला वाटतं आज सुट्टी आहे का आज काय खायचंय पण जवान सकाळी उठतो तेव्हा त्याला फक्त एकच प्रश्न असतो आज माझा देश सुरक्षित आहे का करणने पण हाच विचार केला असेल लग्न जवळ आलंय पण आधी देश मग लग्न आधी कर्तव्य मग घर

जवानाचा त्याग त्याच्या घरापासून सुरू होतो तो वयाच्या वीस बावीस वर्षी घर सोडतो आईच्या हातचं जेवण सोडतो बायकोचा हात सोडतो मुलाचं बालपण सोडतो आणि जातो तिथे जिथे ना घर आहे ना माणसं आहेत फक्त बर्फ आहे डोंगर आहे आणि शत्रू आहे करणने पण आपलं होणारं लग्न आपलं होणारं संसाराचं स्वप्न बाजूला ठेवलं आणि देशाला पहिलं स्थान दिलं

ज्या घरात काही दिवसांनी लग्नाचा आनंद साजरा होणार होता तिथे आता शोककळा पसरली आहे जिथे लग्नाची पत्रिका वाटली जात होती तिथे आता शोकसंदेश पोहोचतोय जिथे वरात निघणार होती तिथे आता अंत्ययात्रा निघणार आहे आई वडिलांनी मुलाच्या लग्नासाठी पाहिलेली स्वप्ने एका क्षणात अपूर्ण राहिली

आई म्हणत असेल माझ्या मुलाच्या हातावर मेहंदी लागणार होती आता त्याच्या कपाळावर चंदन लागणार आहे वडील म्हणत असतील मी माझ्या मुलाची वरात काढणार होतो आता मी त्याच्या पार्थिवाला खांदा देणार आहे होणारी बायको जिच्या हातात चूडा येणार होता तिच्या हातात आता फक्त आठवणी राहिल्या जिच्या स्वप्नात संसार होता तिच्या स्वप्नात आता फक्त करणचा चेहरा राहिला लग्नाची तारीख ठरली होती पण नियतीने वेगळीच तारीख लिहिली होती

हा त्याग फक्त करणचा नाहीये त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा आहे त्याची आई रोज देवापुढे दिवा लावत होती माझा मुलगा सुखरूप राहू दे त्याची होणारी बायको रोज फोनची वाट बघत होती एक फोन आला की जीवात जीव येतो ही वाट पाहणं हा पण एक त्यागच आहे आणि हा त्याग फक्त फौजी कुटुंबच समजू शकतं

जवान जर नसता तर काय झालं असतं याचा विचार कधी केलाय का आपण रात्री शांत झोपू शकलो नसतो आपल्या मुली शाळेत सुरक्षित जाऊ शकल्या नसत्या आपण मंदिरात मशिदीत चर्चमध्ये मोकळेपणाने जाऊ शकलो नसतो आपला तिरंगा अभिमानाने फडकला नसता जवानाच्या त्यागामुळेच आज आपला देश उभा आहे

आज आपण जवानाला फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला आठवतो पण जवान रोज देशासाठी मरतो रोज देशासाठी जगतो करण रोज देशासाठी जगला आणि शेवटी देशासाठीच गेला त्याचा त्याग रोजचा होता त्याचा त्याग प्रत्येक क्षणाचा होता

करण गेले पण त्यांची कहाणी संपली नाही त्यांची कहाणी प्रत्येक तरुणाला सांगेल की देशासाठी जगणं म्हणजे काय आणि देशासाठी मरणं म्हणजे काय लग्नाची वरात न निघालेला हा जवान आता तिरंग्यात लपेटून येईल आणि संपूर्ण गाव त्याला सलाम करेल

जवानाच्या त्यागाचं महत्त्व आपण कसं जपू शकतो त्याच्या कुटुंबाचा आदर करून त्याच्या आई वडिलांना आधार देऊन आणि देशाच्या नियमांचं पालन करून देशाला स्वच्छ ठेवून देशाला पुढे नेऊन हाच खरा जवानाला सलाम असेल

शेवटी एकच सांगावं वाटतं जवानाचं बलिदान कधीच वाया जात नाही त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून हा देश पुन्हा उभा राहतो त्याच्या त्यागामुळेच आपण आज मोकळा श्वास घेतोय म्हणून जवान दिसला की फक्त त्याला पाहू नका त्याला मनापासून सलाम करा

वीर जवान करण चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच प्रार्थना....

#वायरल
#शहीद
#new
#sainik
#javan
#alighad
#vir
#foujiwife
📲Get App