🔥 ट्रेंडिंग Health Department Approves High-Tech D... चकाई विधानसभा क्षेत्र में जनता का वोट:... Mallige Suburban Rail Line in Bengalur... शाहजहांपुर: उपनिरीक्षक विनय कुमार पाण्... दीपावली पर मिठाई का डिब्बा पाने की चाह... राहुवास पुलिस की बड़ी कार्रवाई: 10 हजा...
14 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
उपविभागीय कृषी अधिकारी, कल्याण जि -ठाणे 
 पाण्याचा काटकसरीने वापर; वनराई बंधारे बांधण्याची धडक मोहीम राबविण्याचे आवाहन
टेक्नोलॉजी

उपविभागीय कृषी अधिकारी, कल्याण जि -ठाणे पाण्याचा काटकसरीने वापर; वनराई बंधारे बांधण्याची धडक मोहीम राबविण्याचे आवाहन

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 14 अक्टू. 2026, 01:43 PM 👁 14
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
उपविभागीय कृषी अधिकारी, कल्याण जि -ठाणे
पाण्याचा काटकसरीने वापर; वनराई बंधारे बांधण्याची धडक मोहीम राबविण्याचे आवाहन

जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे,
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दि. १४ ऑक्टोबर २०२६ :
ठाणे मुरबाड विशेष वृत्त
सन 2026 मध्ये एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचे आगमन उशिरा होऊन पावसाचा कालावधी तुलनेने कमी राहिल्याने तसेच मान्सूनने लवकर माघार घेतल्याने उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन व संवर्धन करणे आवश्यक आहे. आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम व काटकसरीने वापर करून शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याची धडक मोहीम राबविण्यात यावी, असे आवाहन मा. आशिष बालगुडे, उपविभागीय कृषि अधिकारी, कल्याण यांनी केले आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 42 वनराई बंधारे झाले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील विविध नाले, ओढे व लघु जलप्रवाहांमध्ये सध्या उपलब्ध असलेले पाणी वाहून जाऊ न देता स्थानिक पातळीवर लोकसहभागातून वनराई बंधारे उभारल्यास पाणी अडवून त्याचा शेतीसाठी उपयोग करता येणे शक्य आहे. तसेच अडविलेल्या पाण्यामुळे परिसरातील भूजल पुनर्भरणास मदत होऊन विहिरी व इतर जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास हातभार लागणार आहे.

पाणी फाउंडेशनच्या शेतकरी गटांनी पुढाकार घ्यावा

ठाणे जिल्ह्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामात सहभागी असलेल्या शेतकरी गटांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. गावातील शेतकरी, पाणी फाउंडेशनचे गट, ग्रामस्थ, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वयाने उपलब्ध नाले व ओढ्यांची पाहणी करून वनराई बंधाऱ्यांसाठी योग्य ठिकाणे निश्चित करावीत.

‘लोकसहभागातून पाणी अडवा–पाणी जिरवा’ या संकल्पनेतून उपलब्ध स्थानिक साधनसामग्री व श्रमदानाचा वापर करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पाणी अडविण्याचा प्रयत्न करावा.

सर्व तालुक्यांमध्ये क्षेत्रीय पाहणी करून तातडीने कार्यवाही करावी

ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर उपलब्ध नाले, ओढे व जलप्रवाहांची पाहणी करावी. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे आणि वनराई बंधारा बांधणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे, अशा ठिकाणी संबंधित शेतकरी गट व ग्रामस्थांच्या सहभागातून तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

वनराई बंधारा उभारण्यापूर्वी संबंधित ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, पाण्याचा प्रवाह, बंधाऱ्याची सुरक्षितता तसेच लगतच्या शेतजमिनींवर होणारा संभाव्य परिणाम यांचा विचार करून योग्य नियोजन करावे.

रब्बी हंगामात पाण्याचा कार्यक्षम वापर करणे

मान्सूनच्या लवकर माघारीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातील पिकांसाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यानुसार पिकांची निवड करावी. ठिबक व तुषार सिंचनास प्राधान्य देऊन पाण्याचा कार्यक्षम वापर करावा, तसेच जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी आवश्यक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.

वनराई बंधारे, शेततळी, नाला खोलीकरण, गाळ काढणे, बांधबंदिस्ती व इतर जलसंधारणाच्या उपाययोजनांचा प्रभावी वापर करून पाण्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.

मा. आशिष बालगुडे यांचे आवाहन

याबाबत मा. आशिष बालगुडे, उपविभागीय कृषि अधिकारी, कल्याण यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील शेतकरी बांधव, पाणी फाउंडेशनच्या शेतकरी गट तसेच कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना आवाहन केले आहे की,

“उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब शेतीसाठी महत्त्वाचा आहे. नाले व ओढ्यांमधील उपलब्ध पाणी वाहून जाऊ न देता लोकसहभागातून वनराई बंधारे उभारावेत. शेतकरी गटांनी गावपातळीवर पुढाकार घ्यावा आणि कृषि विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करावे. सर्वांनी एकत्रितपणे काम करून रब्बी हंगामासाठी उपलब्ध पाण्याचे संवर्धन व योग्य नियोजन करावे.”

ठाणे जिल्ह्यात *पाणी आडवा – पाणी जिरवा – पाणी वाचवा – पाणी काटकसरीने वापरा* या संदेशानुसार जलसंधारणाची लोकचळवळ अधिक प्रभावी करण्याचे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

मा.उपविभागीय कृषी अधिकारी , कल्याण जिल्हा ठाणे.
📲Get App